राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेत्याला पाठीशी घालण्यात येणार नाही. दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होईल, असा ईशारा महाजन यांनी दिला. बारा पैकी दोन धरणांची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. अनियमितता आणि सह्या करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे एसीबीची कारवाई होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
कोकणातील 12 कामांत गंभीर अनियमितता
राज्यातील गोसेखुर्द, कोकणसह 94 कामे रद्द करुन पुन्हा निविदा काढण्यात येणार आहेत. गोसेखुर्दच्या कामात अनियमितता आढळल्याने एसीबी कडून चौकशी सुरु आहे. कोकणातील कामात गंभीर अनियमितता आहे. त्यातील 12 पैकी दोन प्रकल्पांची चौकशी करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांना अटक झाली असून ठेकेदार तुरुंगात आहे. शेवटचं आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून ईतर दोषींवरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.