रायगड: रायगडच्या माणगावातील देवकुंडच्या नदीपात्रात बुडालेल्या दोनपैकी एका तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे. तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरु आहे.
अखिल चौधरी आणि नितीन पथक अशी वाहून गेलेल्या दोघांची नावं आहेत. अखिल मूळचा दिल्लीचा तर नितीन वाराणसीचा असून शिक्षणानिमित्त हे दोघंही पुण्यात राहात होते.
भिरा येथील देवकुंड धबधबा परिसरात हे दोघं बुडाले. या दोन्ही तरुणांचा शोध सुरुच आहे.
रविवारी दुपारी दोघे बुडाले
रविवारी दुपारच्या सुमारास माणगाव तालुक्यातील भिरा येथील कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंड येथील धबधब्याच्या परिसरात पर्यटकांनी वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी गर्दी केली होती. याचवेळेस पुणे येथून आलेल्या पर्यटकांच्या दोन ग्रुपमधील दोन तरुण हे देवकुंड येथील धबधब्याच्या पाण्यात बुडल्याची घटना घडल्याची माहिती माणगाव पोलीसांना देण्यात आली.
माणगाव पोलिसांनी तातडीने रिव्हर राफ्टर्सना पाचारण करून घटनास्थळाकडे धाव घेतली होती. त्यानंतर राफ्टर्सच्या मदतीने सायंकाळी उशिरापर्यंत या दोन्ही तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आले होते.
यामध्ये पुण्यातील भोसरी येथील 23 वर्षीय अखिल चौधरी आणि पुण्यातील 25 वर्षीय विद्यार्थी नितीन पाठक हे पाण्यात बुडाले आहेत. तर काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी मुंबई येथील 55 विद्यार्थी अडकल्याने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली होती.