नागपूरजवळ दोन बसची समोरासमोर धडक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Sep 2016 11:53 AM (IST)

NEXT
PREV
नागपूर: नागपूर जिल्ह्याच्या कोंढाळी येथे 2 एसटी बसची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात 23 प्रवासी जखमी तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
आज सकाळी 9.30 सुमारास कोंढाळी-काटोल आणि काटोल- कोंढाळी अशा दोन्ही बसेसची नागपूरहून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या चक्रीघाटात समोरासमोर धडक झाली. घाटात समोरून येणारी बस दिसली नसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघातात 23प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना थेट नागपूरला हलवण्यात आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -