1st January Headlines : कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी येणार. अजित पवार (सकाळी 6 वाजता), चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जितेंद्र आव्हाड हे नेतेही कोरेगाव भीमाला भेट देतील.


ठाकरे सरकारच्या 19 बंगले घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या एफआयआर दाखल करणार


मुंबई- ठाकरे सरकारच्या 19 बंगले घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करणार आहेत, सकाळी 11.30 वाजता. 


सिल्लोडला राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार 


औरंगाबाद-  सिल्लोडला राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, अर्थराज्यमंत्री भागवत कराड उपस्थित राहणार आहेत, दुपारी 2 वाजता. 


शरद पवार इंदापूर दौऱ्यावर


इंदापूर- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार इंदापूर दौऱ्यावर येत असून ते दत्तात्रय भरणे यांच्यासोबत आधुनिक द्राक्ष बागेची पाहणी करणार आहेत, सकाळी 10.15 वाजता. 


हिंदू समाजाकडून लव्ह जिहादच्या विरोधी मोर्चा


कोल्हापूर- सकल हिंदू समाजाकडून लव्ह जिहादच्या विरोधी मोर्चा काढण्यात येणार आहे, सकाळी 10 वाजता


भाजप मेळावा आणि नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार


सांगली- भाजप मेळावा आणि नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार होणार आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील आणि जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहतील, सकाळी 11 वाजता. 


धुळ्यात भव्य मॅरेथॉन 


धुळे- तालुक्यातील बोरकुंड येथे नववर्षानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, सकाळी 8 वाजता. 


युवक बिरादरी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराला सुरुवात


धुळे- शहरातील युवक बिरादरी संस्थेच्या वतीने रक्तदान करून नववर्षाचे स्वागत केले जाते. गेल्या 40 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. आज रात्री 10 वाजता या रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे


हिंदू धर्म जागरण समितीद्वारे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी आज रॅली


नागपूर- हिंदू धर्म जागरण समितीद्वारे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी आज रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील पारडी परिसरात पुनापूर या ठिकाणी रॅली काढली जाणार आहे, सकाळी 10 वाजता. 


आजपासून या गोष्टी बदलणार 
 
- पोस्ट ऑफिस योजनेचा व्याजदर वाढणार
- वाहने महागणार 
- क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल
- बँक लॉकरचे नियम बदलणार
- विमा प्रीमियम महागण्याची शक्यता