Happy New Year 2023: संपूर्ण जग 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे केले जाते. आता देखील नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह आपण पाहतच आहोत. पण नव वर्ष फक्त 1 जानेवारीलाच साजरे होते असे नाही. जगभरात नवीन वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना साजरे केले जाते. वेगवेगळे धर्म आणि पंथही आपापल्या परीने वेगवेगळ्या तारखांना नवीन वर्ष साजरे करतात. या सर्वांमध्ये हिंदू नववर्षाची ओळख वेगळी आहे.
आज या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की 2023 मध्ये हिंदू नववर्ष कधी येणार आहे.
हिंदू नववर्ष कधी साजरे केले जाते?
सनातन धर्मानुसार हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरे केले जाते. हीच तीच वेळ असते जेव्हा झाडं आणि फुलं शरद ऋतूनंतर वसंत ऋतुमध्ये प्रवेश करतो. वाळलेल्या पानांच्या जागी नवीन हिरवी पाने येतात. सर्वत्र हिरवाई पसरते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भगवान ब्रह्मदेवाने या तिथीला विश्वाची निर्मिती केली. यामुळेच सनातन धर्मात दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला नववर्ष साजरे केले जाते.
2023 मध्ये हिंदू नववर्ष कोणत्या तारखेला येत आहे?
2023 मध्ये हिंदू नववर्ष 22 मार्च 2023 रोजी येत आहे. म्हणजेच हिंदू दिनदर्शिकेनुसार 22 मार्च ही चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. या दिवशी महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी गुढी उभारुन नवीन वर्ष साजरं केलं जातं. भारतात या दिवशी सनातन धर्माला मानणारे लोक नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे करतात. या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घरात पूर्ण भक्तीचे वातावरण असते आणि दिवसाची सुरुवात पूजेने होते.
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला हिंदू ज्या प्रकारे त्यांचे नवीन वर्ष साजरे करतात, त्याचप्रमाणे भारतात राहणारे इतर धर्माचे लोक त्यांचे नवीन वर्ष त्यांच्या पद्धतीने साजरे करतात. पंजाबींसाठी नवीन वर्ष बैसाखीच्या दिवशी सुरू होते, जे 2023 मध्ये 13 एप्रिल रोजी येणार आहे. नानकशाही कॅलेंडरनुसार, होला मोहल्ला हे त्यांच्यासाठी नवीन वर्ष आहे आणि ते 14 मार्च रोजी असेल.
काश्मिरी पंडित त्यांचे नवीन वर्ष नवरेहच्या दिवशी साजरे करतात, 2023 मध्ये ते 19 मार्च रोजी येईल. मारवाडी लोक त्यांचे नवीन वर्ष दिवाळीच्या दिवशी साजरे करतात, तर गुजरातचे काही लोक त्यांचे नवीन वर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजरे करतात. पोहेला बैसाखीच्या दिवसापासून बंगाली लोक त्यांचे नवीन वर्ष साजरे करतात.
ही बातमी देखील वाचा
2023 मध्ये काय काय चांगलं घडणार, पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितल्या महत्वाच्या गोष्टी