सावंतवाडी: आंबोली घाटातील पूर्वीचा वस परिसरात कॉलेज युवकाचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. फोटोसाठीचा अतिउत्साहीपणा तरुणाच्या जीवावर बेतला आहे.

 

धबधब्याजवळ पाय घसरल्याने खोल दरीत पडून युवकाचा मृत्यू झाला. रुद्राप्पा विठ्ठल बजेरी (19 वर्ष) असं त्याचं नाव असून तो बेळगावचा रहिवासी होता.

 

पिकनिकसाठी आंबोली घाटात 11 जणांचा ग्रुप आला होता. त्याचवेळी फोटो काढण्याच्या नादात तरुणाचा पाय घसरला आणि तो थेट 60 फूट दरीत कोसळला. आज (शनिवार) सकाळी १० वाजता ही घटना घडली. सोबत असलेल्या मित्रांना आरडाओरडा केल्यानं स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. अखेर दुपारी तरुणाचा मृतदेह सापडला. सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह पाठविण्यात आला आहे.