मुंबईः बँकांना कोट्यवधी रुपयांचा चूना लाऊन परदेशी पळालेल्या विजय मल्ल्याच्या ताफ्यातील एक-एक वस्तूंचा आता लिलाव व्हायला सुरुवात झाली आहे. मल्ल्याच्या 8 गाड्यांचा 'एसबीआय कॅप' UR ही कंपनी लिलाव करणार आहे.
मल्ल्याने 17 कोटींहून अधिक रुपयांचा चूना लावून परदेशात पळ काढला आहे. या गाड्यांचा लिलाव 25 ऑगस्ट रोजी होणार असून यातून 'एसबीआय कॅप' कंपनीला 13.70 लाखांची किंमत अपेक्षित आहे.
मल्ल्याकडून एसबीआय बँकेला 6 हजार 963 कोटींची किंमत येणं अपेक्षित आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचं कर्ज चुकवण्यासाठी ईडीने 1411 कोटींची संपत्ती जप्त केली होती.