मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. विधानपरिषदेत आज लेखानुदान मंजूर झालं. त्यानुसार सरकार आमदारांचं निलंबन मागे घेण्याची शक्यता आहे.

परंतु एकाच वेळी सर्व 19 आमदारांचं निलंबन रद्द होणार नाही. दोन टप्प्यात आमदारांचं निलंबन रद्द केलं जाण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे 29 मार्चला 12 आमदारांचं  निलंबन रद्द केलं जाणार आहे,  तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 एप्रिलला उर्वरित 7 आमदारांचं निलंबन रद्द केलं जाणार

निलंबनाविरोधात आमदारांनी संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा केली होती. आता निलंबन मागे घेतलं तरी विरोधक संघर्ष यात्रेच्या भूमिकेवर ठाम आहेत.

दरम्यान, अर्थसंकल्पादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं 9 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेसच्या 9 आणि राष्ट्रवादीच्या 10 आमदारांचा समावेश आहे.

सहकाऱ्यांना सभागृहाबाहेर बसवण्याची आम्हाला हौस नाही : बापट

"आमदारांचं निलंबन मागे घेणार नाही, असं नाही. सभागृहातील कामकाज खेळीमेळीने झालं पाहिजे. निलंबन मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. आम्ही मार्ग काढू. विरोधी पक्षांनी 29 तारखेला सभागृहात यावं, त्यांना मानाने घेऊ, एकत्रित बसून निर्णय घेऊ. सहकाऱ्यांना सभागृहाबाहेर बसवण्याची आम्हाला हौस नाही," असं संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी विधानसभेत सांगितलं.

हे आमदार निलंबित

काँग्रेसचे निलंबित आमदार

  1. अमर काळे – काँग्रेस,  आर्वी मतदारसंघ, वर्धा

  2. विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर

  3. हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा

  4. अब्दुल सत्तार – काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद

  5. डी.पी. सावंत – काँग्रेस, नांदेड उत्तर

  6. संग्राम थोपटे – काँग्रेस, भोर, पुणे

  7. अमित झनक – काँग्रेस, रिसोड, वाशिम

  8. कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण

  9. जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा


www.abpmajha.in 

राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार

  1. भास्कर जाधव – राष्ट्रवादी- गुहागर मतदारसंघ, रत्नागिरी

  2. जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे

  3. मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी

  4. संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर

  5. अवधूत तटकरे – राष्ट्रवादी, श्रीवर्धन, रायगड

  6. दीपक चव्हाण – राष्ट्रवादी, फलटण – सातारा

  7. नरहरी जिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस  दिंडोरी, नाशिक

  8. वैभव पिचड- राष्ट्रवादी, अकोले – अहमदनगर

  9. राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर

  10. दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे


संबंधित बातम्या

जितेंद्र आव्हाडांसह 19 आमदार 9 महिन्यांसाठी निलंबित

19 आमदारांचं निलंबन : कोण काय म्हणालं?

निलंबित आमदारांच्या यादीतून 2 नावं ऐनवेळी वगळली

मतदानाच्या भीतीने 19 आमदारांचं निलंबन?

...म्हणून मोजून 19 आमदारांचं निलंबन : पृथ्वीराज चव्हाण