औरंगाबाद : औरंगाबादमध्ये झोका खेळताना झोक्याच्या नॉयलॉन दोरीचा गळफास लागून एका 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या प्रकाशनगर इथं ही घटना घडली. किशोर गुंजाळ असं मृत मुलाचं नाव आहे. तो आठवीत शिकत होता.


काल (सोमवार) संध्याकाळी शाळेतून घरी आलेला करण क्लासला जाणार होता. मात्र, त्याआधी तो घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोका खेळायला गेला. त्यावेळी झोका खेळताना त्याला नॉयलॉन दोरीचा गळफास लागला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

काही वेळाने करणची बहीण घरी आल्यानंतर तिने करणबद्दल विचारणा केली. त्यानंतर करणची शोधशोध सुरु झाली. त्यावेळी घरच्यांनी दुसरा मजला गाठला आणि ही घटना उघडकीस आली. त्यानंतर करणला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनं संपूर्ण गुंजाळ कुटुंबावर शोककळा पसरली आहे.