सोलापूर : वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेतून 14 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम या रेल्वेत सोलापूरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

जीआरपी पोलिसांनी पकडलेले दोन प्रवासी व्यापारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच दोघेही मुंबईचे रहिवासी असल्याची माहिती आहे. विजयवाड्याला जाताना सोलापूर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली.

जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत साडे चार कोटी रुपये एवढी आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी आता आयकर विभागाला पाचारण केलं आहे.