पुणे : पुण्यातील चाकणच्या खराबवाडीत एका घरामध्ये तब्बल 125 ते 150 साप सापडले आहेत. नाग, घोणस जातीच्या विषारी सापांचा समावेश आहे.
चाकण पोलिसांनी सोमवारी रात्री टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघड झाला आहे. सापांसोबत विषाच्या दोन बाटल्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
त्यामुळे विषाची तस्करी करण्यासाठी या सापांना पाळल्याचा अंदाज पोलिसांना व्यक्त केला आहे. हे साप पत्र्याच्या पेटीत ठेवले होते.
याप्रकरणी दळवी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. हा व्यक्ती कधीपासून हे साप पाळत आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.