मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर होणार आहे. ऑनलाईन ही यादी जाहीर होईल. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 जून रोजी पूर्ण झाली. दरम्यान सर्व्हरमध्ये आलेल्या अडचणींमुऴे या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढही देण्यात आली होती. या प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणून आज सकाळी 11 वाजता पहिली सर्वसाधारण यादी ऑनलाईन उपलब्ध असेल.
अकरावीची प्रक्रिया ऑनलाईन झाल्यापासून प्रवेश केवळ ऑनलाईन स्वरुपात होऊ लागले आहेत. अकरावीसाठी लाखो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. 13 जूनला दहावीचा निकाल लागल्यानंतर 16 जूनपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.
दरम्यान आज जाहीर होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण यादीतून विद्यार्थ्यांना आपल्या अर्ज भरताना झालेल्या चुका कळणार आहेत, तसंच सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील आपला क्रमांकही कळेल.