पुलाचा कठडा तोडून बस 100 फूट खाली कोसळली.
मृतांमध्ये पुण्यातील बालेवाडी आणि पिरंगुट इथल्या लोकांचा समावेश आहे. 26 जानेवारीला लागून आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे पुण्याच्या बालेवाडी आणि पिरंगुट परिसरात राहणारे भरत केदारी , संतोष वरखडे , दिनेश नांगरे यांचे कुटुंबीय कोकण पर्यटनासाठी 17 सीटर मिनी ट्रॅव्हलरमधून (एमएच १२ एनएस ८५५६) निघाले होते. त्यादरम्यान कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि पुलाचा दगडी कठडा तोडून बस थेट 100 फूट खोल असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रात कोसळली.
हा अपघात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते.
26 जानेवारी निमित्ताने सलग सुट्ट्या लागल्याने पुण्याच्या बालेवाडी आणि पिरंगुटे परिसरात राहणारे भरत केदारी , संतोष वरखडे , दिनेश नांगरे यांचे कुटुंबीय कोकण पर्यटनासाठी 17 सीटर मिनी ट्रॅव्हलर मधून निघाले होते. काल सकाळी हे कुटुंबीय गणपतीपुळे इथून देवदर्शन आटोपून कोल्हापूरला निघाले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिवाजी पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने, मिनी ट्रॅव्हल्स पुलाचा दगडी कठडा तोडून वरुन थेट 100 फूट खोल असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रात कोसळली.
गाडी कोसळल्याचा आवाज एकूण त्याच परिसरातील तरुणांनी बचावकार्य सुरु केलं. ही माहिती आपत्ती व्यवस्थापनाला समजल्यावर पोलीस,फायरब्रिगेड, घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. सुरुवातीला पाण्यात बुडालेल्या गाडीतील 7 जणांना काढण्यात यश आलं . परंतु तासभर प्रयत्न करून देखील मिनी बस गाळातच रुतून बसल्यामुळे गाडीतील इतर प्रवाशांना बाहेर काढता आलं नाही.
अखेर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त मिनी बस पाण्यातून बाहेर काढण्यात आली आणि गाडीतील उर्वरित 7 जणांना बाहेर काढण्यात आले. गाडीत एकूण 14 प्रवासी होते, यातील 11 मृतदेह काढण्यात आलेत तर तीन जखमींवर सीपीआर रुगणालायात उपचार सुरु आहेत, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला.
कोल्हापूर पोलीस, फायरब्रिगेड, समाजसेवी संस्था आणि कोल्हापुरातील तरुणांच्या संयुक्त प्रयत्नातून सुमारे 4 तास रेस्क्यू ऑपरेशन केलं. अद्यापही पंचगंगा नदी पात्रात मृतदेहाचा शोध सुरू आहे.
अपघात झाल्याचं समजताच पंचगंगा नदी घाटावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. घटनास्थळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील , जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी भेट देऊन पाहणी केली आहेत.
बस कोसळली ते बचावकार्य
रात्री ११.३० वा. गणपतीपुळेहून बस कोल्हापूरकडे आली.
रात्री ११.३५ च्या सुमारास बस शिवाजी पुलावरुन पंचगंगा नदीत कोसळल्याचा अंदाज
रात्री ११.४० वा. जुना बुधवार तालीम मंडळाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल
रात्री ११.४५ परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेऊन तातडीनं बचावकार्याला प्रारंभ
रात्री ११.५० पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल, बचावकार्याला वेग
रात्री १२.०० दोन जखमींना बाहेर काढण्यात यश
रात्री १२.३० पहिले सहा मृतदेह स्थानिक तरुणांनी बाहेर काढले
रात्री १२.४५ अपुरा प्रकाश आणि तज्ज्ञ मनुष्यबळाच्या अभामुळे बचावकार्यात अडथळे
रात्री १.३० वा. आणखी चार मृतदेह बाहेर काढण्यात यश
रात्री २.०० वा. घटनास्थळी क्रेन दाखल
पहाटे. ३.३५ वा. दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बस नदीतून काढण्यात आली, बसमध्ये आणखी मृतदेह सापडला.
पहाटे. ५.४५ वा. अंदाजे ६ महिन्याच्या बाळाचा मृतदेह नदीतून काढण्यात आला.
सकाळी ७.०० वा. नदीतून मृतदेह काढण्याचे काम थांबवले
बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात वारंवार अडथळे
मृतांची नावे
- गौरी वरखडे (वय 16)
- ज्ञानेश्वरी वरखडे (वय 14)
- संतोष वरखडे (वय 45)
- साहील केदारी (वय 14)
- निलम केदारी (वय 28)
- भावना केदारी (वय 35)
- सचिन केदारी (वय 34)
- संस्कृती केदारी (वय 8)
- श्रावणी केदारी (वय 11)
- सानिध्य केदारी (10 महिन्यांचं बाळ)
- प्रतिक नांगरे (वय 14)
- छाया नांगरे (वय 41)
- बसचालक (वय 28)
जखमी व्यक्तींची नावे
- प्राजक्ता दिनेश नांगरे (वय 18)
- मनिषा संतोष वरखडे (वय 38)
- मंदा भरत केदारी (वय 54)