मुंबई : कोकणात जाणाऱ्या पर्यटक आणि चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कोकण रेल्वेवर वाढलेली रहदारी लक्षात घेता या मार्गावर नव्या अकरा रेल्वे स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे.

 

यामध्ये रायगड जिल्ह्यातील इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामाने, रत्नागिरी जिल्ह्यातल्या कडवई, कळमणी, पोमेंडी, वेरवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खारेपाटण, आचीर्णे आणि गोव्यातल्या मिरझण आणि इनान्जे या नव्या स्थानकांचा समावेश आहे.

 

या नव्या 11 रेल्वेस्थानकांना मंजुरी:

  1. इंदापूर (रायगड)

  2. गोरेगाव रोड (रायगड)

  3. सापे वामाने (रायगड)

  4. कडवई (रत्नागिरी)

  5. कळमणी (रत्नागिरी)

  6. पोमेंडी (रत्नागिरी)

  7. वेरवली (रत्नागिरी)

  8. खारेपाटण (सिंधुदुर्ग)

  9. आचीर्णे (सिंधुदुर्ग)

  10. मिरझण (गोवा)

  11. इनान्जे (गोवा)


 

पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेवर विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात 36 धोकादायक ठिकाणी 24 तास जागता पहारा ठेवण्यासाठी रोडसेन्सर लावण्यात येतील. त्यासाठी 950 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.