सोलापूर : सोलापुरात ऐन निवडणुकीच्या काळात अवैध दारुसाठा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या कारवाईत 11 लाखांची दारु जप्त करण्यात आली आहे.


सोलापूरमधील दमाणी नगर भागात देशी दारुचं पॅकिंग केलं जात होतं. एका घरातच हा बॉटलिंग प्लँट बसवण्यात आला होता. देशी दारुला विदेशी दारुचं लेबल लावून त्याची विक्री करण्यात येत होती.

उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सागर धोमकर यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात एवढा मोठा दारुसाठा सापडल्यानं खळबळ उडाली आहे.