लातूर : उदगीर येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 27 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 11 जणांची प्रकृती उत्तम असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या उदगीर शहर वगळता संपूर्ण लातूर जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे.
सुरुवातीच्या काळात परराज्यातील 12 प्रवाशी आंध्रप्रदेशात जात असतांना निलंगा येथे आढळून आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यापैकी आठ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. त्यांच्यावर लातुर येथील विलासराव देशमुख विज्ञान संस्थेत उपचार करण्यात आले. त्यांनंतर त्यांना निलंगा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. लवकरच त्यांना त्यांच्या आंध्र प्रदेशातील मुळगावी पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान संपूर्ण लातुर जिल्हा कोरोनामुक्त झाला असताना उदगीर येथे एका महिलेस कोविड 19 ची लागण झाली. त्यात महिलेचा मृत्युही झाला. त्यानंतर संबंधित कुटुंब तसेच परीरसरातील नागरीकांची तपासणी केली असता आज पर्यंत एकूण 27 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रुग्णांवर उदगीर येथील कोविड 19 रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. यापैकी 11 जणांची प्रकृती ठणठणीत बरी झाली आहे. त्यांच्यात कोविड 19 ची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे या 11 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. यापुढील काही दिवस त्यांना त्यांच्या घरी होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. उर्वरित 16 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांनाही लवकरच सुटी देण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाशी लढणाऱ्या आशा स्वयंसेविकांचं आंदोलन; सुरक्षा, वाढीव मोबदल्याची मागणी