11 April In History:  आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे.  देशात मुलींची पहिली शाळा सुरू करणारे, समाजसुधारक महात्मा फुले यांची जयंती आहे.  महात्मा फुले यांनी सामाजिक चळवळीत दिलेले योगदान आजही काळाच्या ओघात महत्त्वाचे ठरत आहे. तर, महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. प्रसिद्ध गायक कुंदनलाल सैगल यांचा जन्मदिन आज आहे. जगभरातील श्रमिकांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आजच्या दिवशी जागतिक कामगार संघटनेची (International Labour Organization) आज स्थापना झाली. 



जागतिक कामगार संघटनेची स्थापना International Labour Organization 


आंतरराष्ट्रीय मजूर संस्था ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. 1919 मध्ये याची स्थापना झाली होती. ही संस्था जगातील मजूर वर्गाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगारांच्या अधिकारांचे, त्यांच्या न्यायपूर्ण मागण्यांचे मानक तयार करून त्यांची सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी प्रयत्न जागतिक कामगार संघटनेच्या माध्यमातून केली जातात. जवळपास 187 देश या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे सदस्य आहेत. 


वर्षातून एकदा, ILO ची व्यापक धोरणे ठरवण्यासाठी जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय कामगार परिषद आयोजित करण्यात येते. ही परिषद ILO चे सामान्य धोरण, कार्य कार्यक्रम आणि बजेट बद्दल निर्णय घेते आणि प्रशासकीय मंडळाची निवड देखील करते. या परिषदेत राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानही सहभागी होतात. सरकारी आणि इतर दोन्ही आंतरराष्ट्रीय संस्था, पण निरीक्षक म्हणून उपस्थित राहतात.



1827: क्रांतीकारक समाजसुधारक महात्मा फुले यांचा जन्म Mahatma Phule Birth Anniversary


विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये कार्य करणारे महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती. महात्मा फुले यांनी मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली होती. त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करुन पुण्यातील भिडे वाडा येथे शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 


महात्मा फुले हे समाजसुधारणेच्या कार्यात अग्रभागी असेल तरी त्यांनी व्यावसायिक म्हणूनदेखील मोठे यश मिळवले होते.  यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून महात्मा फुले यांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणे, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामे केली. 


क्रांतिकारी व सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांनी समग्र वाङ्मय लिहिले आहे त्यांच्या 'शेतकऱ्यांचा असूड', 'गुलामगिरी', 'ब्राह्मणाचे कसब' या ग्रंथांतून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग याचे समग्र चित्रण महात्मा फुले यांनी केले आहे. त्यांच्या लिखाणात तत्कालीन निद्रिस्त उपेक्षित समाजाला जागृत करून, त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकत निर्माण करण्याची क्षमता होती. यामुळेच महात्मा फुले यांचे लिखाण हे निर्विवाद क्रांतिकारी समजले जातात. 


बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप विधवाविवाह पुनर्विवाह, शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड, आदी कार्येदेखील त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर त्यांनी पोवाड्याचे लेखन केले होते. 


1882 मध्ये महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर  प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली होती. 


1888 मध्ये मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली. 


1869 : कस्तुरबा गांधी यांचा जन्म Kasturaba Gandhi Birth Anniversary


कस्तुरबा मोहनदास गांधी या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने 'बा' असे संबोधले जायचे. गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. 1906 साली गांधीजींनी ब्रम्हचर्य पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. असे असूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. त्या खूप धार्मिक होत्या. असे असूनही, आपल्या पतीप्रमाणेच त्यांनी जातिभेदाचा त्याग केला आणि सर्व जातिधर्मांच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहिल्या.


1904 : गायक कुंदनलाल सैगल यांचा जन्मदिन Singer Kundanlal Saigal Birth Anniversary


रताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय बोलपटातील सर्वात लोकप्रिय गायक, अभिनेते कुंदनलाल सैगल यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉईस’म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘बाबुल मोरा’ हे स्ट्रीट सिंगर चित्रपटातील गाणे अजूनही लोकप्रिय आहे. गझल, भजने, ठुमरी, अंगाई गीत, बालगीत अशी अनेक प्रकारची गाणी त्यांनी सहजतेने गायली. 


1955: अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म Rohini Hattangadi Birthday


रंगभूमीवरील व चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा आज जन्मदिवस. रिचर्ड ॲटनबरो निर्मित 'गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबा'च्या भूमिकेमुळे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगभरात पोहोचल्या. त्यावेळी त्यांचे वय अवघे 27 वर्ष होते. या चित्रपटात 74 वर्षांच्या कस्तुरबा गांधी यांची भूमिका त्यांनी साकारली होती. 


रोहिणी यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. 'अग्निपथ'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती. या व्यक्तिरेखेतून त्यांना वेगळी ओळख मिळाली. अग्निपथ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.  आजवर त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठी बरोबरच अनेक हिंदी, तमिळ, कानडी, तेलुगु चित्रपटांत काम केले आहे.


1976 :  ॲपल कंपनीचे ॲपल 1 हे संगणक तयार


ॲपलची स्थापना स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोजनियाक आणि रोनाल्ड वेन यांनी एप्रिल 1976 मध्ये केली होती आणि वझ्नियाकच्या ॲपल आय पर्सनल कॉम्प्युटरची विक्री केली. 


1992 : भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर 


भालचंद्र गोपाल पेंढारकर म्हणजेच भालजी पेंढारकर यांचा जन्म 3 मे 1898 रोजी कोल्हापुरात झाला. भालजी पेंढारकरांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानासाठी अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले. यामध्ये ‘तांबडी माती’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद या विभागात राष्ट्रीय पारितोषिक, चित्रभूषणजीवन गौरव, ग.दि.मा. पुरस्कार, तसेच 1991 साली भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. मराठीसह हिंदी, गुजराती, बंगाली, तमिळ अशा बहुभाषिक चित्रपटांची निर्मिती भालजींनी केली आहे.