औरंगाबादमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 20 Mar 2017 09:41 PM (IST)
प्रातिनिधिक फोटो
औरंगाबाद: औरंगाबादमधील वाळूज येथील एका दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीतील 16 वर्षीय विद्यार्थिनीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी साडेपाच वाजता ही घटना उघडकीस आली. ही विद्यार्थिनी वाळूज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. आज ती दुपारी विज्ञान भाग 2चा पेपर देऊन घरी आली. त्यावेळी तिचे आईवडील आठवडी बाजाराला गेले गेले. तेव्हा घरी कुणी नसल्याचं पाहून पत्र्याच्या छताला ओढणी बांधून तिनं गळफास घेतला. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अद्याप या आत्महत्येमागचं कारण समजू शकलेलं नाही. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.