Corona Vaccination : मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना (Corona) या वैश्विक महामारीचा सामना करत आहे. भारतातील नागरिकांनाही या रोगाने पुरते त्रासून सोडले आहे. दरम्यान कोरोना विरुद्द लढाईमध्ये लसीकरण हे एक मोठं शस्त्र असल्याचं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितलं. दरम्यान शासनही सर्व नागरिकांचं लसीकरण जोमात करत असताना हिंगोलीतील 108 वर्षांच्या उत्तमराव यांनीही कोरोनावरील लस घेतली आहे. ही एक अत्यंत सकारात्मक बाब असून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घेत ट्वीट केलं आहे.
कोरोना लसीकरण मोहीम देशभरात राज्य आणि केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येत आहे. परंतू नागरिकांकडून अद्याप हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील रहिवासी असलेले 108 वर्षे वयाचे उत्तमराव यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घेत नागरिकांना लसीकरणाचं आवाहन केलं आहे. शिरडशहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील विभागाच्यावतीने प्रत्येक घरी जाऊन कोरोना लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्याच माध्यमातून उत्तमराव यांना लस देण्यात आली आहे.
राज्यात 1 हजार 684 नवे कोरोनाबाधित
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. राज्यात गेल्या 24 तासात 1 हजार 684 नव्या रुग्णांची नोंद झालीय. तर, 17 जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय, 918 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के एवढी झाली आहे.
संबंधित बातम्या :
- Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ; राज्यात आज 1684 नव्या रुग्णांची नोंद, 17 मृत्यू
- PM Modi about Vaccine for children : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तीन मोठ्या घोषणा, बूस्टर डोसबाबतही महत्त्वाची माहिती
- Exclusive : मुलांच्या लसीकरणाबाबत पडलेल्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर; जाणून घ्या चाईल्ड टास्क फोर्सच्या सदस्यांकडून
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha