Maharashtra: महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आज राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतलीय. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याबाबत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आलीय. शिष्ठमंडळाकडून राज्यपालांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.


राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ही निवडणूक या दोन दिवसांमध्ये पार पडावी, यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. वेळी या नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली. राज्यपालांनी सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करून उद्या निर्णय कळवणार असल्याचं सांगितल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. राज्यपाल सकारात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. 


विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना दिलाय. त्यांनी लवकर मंजूरी द्यावी, यासाठी त्यांची भेट घेतलीय. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम उद्याच जाहीर करावा, अशीही त्यांना विनंती करण्यात आलीय. ते हा कार्यक्रम मंजूर करतील अशी आम्हाला खात्री आहे. बिगर अध्यक्षांची विधानसभा कशी चालेल? त्यामुळं ते मान्यता देतील, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी राज्यरपालांची भेट घेतल्यानंतर व्यक्त केलाय. 


एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यपालांनी जे पत्र दिलं होतं सरकारला निवडणुकीबाबत, त्या अनुषंगानेच मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र आम्ही त्यांना दिलंय. येत्या दोन दिवसांत ही निवडणूक व्हावी, अशी आम्ही मागणी केलीय. त्यांची भूमिका सकारात्मक आहे. या बाबतीत कायदेशीर चर्चा करुन यावर उद्या निर्णय कळवतो, असं त्यांनी म्हटलंय.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha