दिवसेंदिवस जिल्ह्यातील केवळ उदगीर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र, आता इतर तालुक्यांमध्येही रुग्ण संख्या वाढत आहे. रविवारी लातूर शहरातील माळी गल्ली आणि चाकूर तालुक्यातील वडवळ येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. तर जळकोट येथील एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. रविवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लातूर आणि चाकूर येथून 11 नमुने तपासणीसाठी आले होते. तर उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून 9 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी आले असून उदगीर शहरातील 3 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.
धक्कादायक! आज राज्यात एका दिवसात सर्वाधिक 2 हजार 347 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
आतापर्यंत कोरोना हा एका शहरापुरता मर्यादित होता. मात्र, यामध्ये आता लातूर, जळकोट आणि चाकूर तालुक्याची भर पडली आहे. पुण्या-मुंबईहून परतलेल्या नागरिकांमुळे हा धोका निर्माण होत आहे. लातूर शहरातील माळी गल्ली येथे आढळून आलेला रुग्ण हा ठाणे येथून परतला होता. तो थेट रुग्णालयात दाखल झाल्याने कुणाच्या संपर्कात आला नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांचे म्हणणे आहे. मात्र, आता लातूर जिल्ह्याला कोरोनाचा धोका वाढला असून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या तोंडावर विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर आहे हे नक्की.
राज्यात आज कोरोना संक्रमितांची विक्रमी वाढ
राज्यात आज विक्रमी 2 हजार 347 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एक दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 600 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंतच 7 हजार 688 जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं आहे. तर, आज 63 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 198 इतकी झाली आहे.
Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट