चालकाला झोप लागल्याने ट्रक उलटला, एका वारकऱ्याचा मृत्यू, 48 जखमी
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2016 01:58 AM (IST)
पंढरपूर : जेऊर-करमाळा रस्त्यावर वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाला आहे. पहाटे झालेल्या या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी झाले आहेत. मोतीराम गोविंद शिंदे असं मृत वारकऱ्याचं नावं आहे. ते निवृत्ती महाराजांच्या पालखीतील वारकरी होते. पंढरपुरात दर्शन घेऊन त्यांचा ट्रक परतत होता. मात्र चालकाला झोप ट्रर उलटला, ज्यात एकाचा मृत्यू झाला तर 48 वारकरी जखमी झाले. सगळे वारकरी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि गंगापूर परिसरातील आहेत.