मुंबई: दहशतवाद्यांना खतपाणी घातल्याचा आरोप झाल्यानंतर डॉ. झाकीर नाईकच्या भाषणांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई पोलिसांनी दिले आहेत. दरम्यान, नाईकच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर नाईकनं एबीपी माझाकडे पहिली प्रतिक्रिया दिली.
कुणीही एखाद्या व्यक्तीची धर्माच्या नावाखाली हत्या करत असेल, तर ते मानवताविरोधी आहे, कुराणविरोधी आहे, आणि आपण अशा कृत्यांचं समर्थन करत नसल्याचं झाकीर नाईकनं दिलेल्या प्रतिक्रीयेत स्पष्ट केलं आहे. मात्र, त्याच्यावर होणाऱ्या आरोपांवर बोलण्याच झाकीर नाईक टाळलं.
तपास यंत्रणांच्या रडारावर असलेला झाकीर नाईकविरोधात दिवसेंदिवस रोष वाढत चालला आहे. बांग्लादेशात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर नाईकवर आरोपांची मालिका सुरु झाली होती. त्यामुळे नाईकविरोधात कठोर कारवाईची मागणी होते आहे.