Maharashtra Weather update: राज्यात किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून बहुतांश भागात थंडीची लाट पसरल्याचे चित्र आहे. मुंबई पुण्यासह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातथंडीने हुडहुडी वाढली आहे. पुण्यात किमान तापमानात घट होऊन तापमान 16 अंशांवरुन थेट 14.3 अंशावर आले आहे. तर पुढील चार दिवसात तापमान 10 अंशावर जाणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर मुंबईत किमान तापमानात हळू हळू घट होऊन मुंबईचा पारा घसण्यास सुरवात झाली आहे, शनिवारी पहाटे मुंबईच किमान तापमान 21.2 अंश इतकं होत, तर तेच तापमान रविवारी पहाटे 18 अंशांपर्यंत खाली घसरलंय. पारा अचानक तीन अंशांनी खाली घसरल्याने पहाटेच्या वेळी का होईना मात्र हवेत गारवा जाणवतोय
Konkan : तळकोकणात थंडीची चाहूल, किमान तापमानात घट, पिकास पोषक वातावरण
दुसरीकडे, तळकोकणातही थंडीची चाहूल लागली असून किमान तापमानात घट झाली आहे. परिणामी आंबा, काजू पिकास पोषक असे वातावरण तयार झाले आहे. सिंधुदुर्गात आज 14 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. गेले काही दिवस तळकोकणात अवकाळीचा मारा होता. नोव्हेंबर महिन्यात देखील अनेक भागात पाऊस कोसळला. मात्र आता किमान तापमानात घट व्हायला सुरुवात झाली आहे. काही भागात धुक्याने देखील हजेरी लावली आहे. कोकण पट्ट्यात किमान तापमानात फरक पडत आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात अजून घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा, काजू पिकासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
Jalgaon : नाशिक, निफाड, जळगावचे तापमान नीचांकी पातळीवर
इतर जिल्ह्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यात थंडीने आता जोर पकडला असून जळगावचे तापमान 10.5 इतक्या नीचांकी पातळीवर खाली पडल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसपर्यंत जळगाव जिल्ह्यात अनेक भागात पाऊस आणि उकाडा असल्याचं चित्र असताना, पावसाने पाठ फिरवताच थंडीने जोर पकडलाय. तर सकाळच्या सुमारस जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे. अशातच थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे.
गेल्या 24 तासात नाशिक आणि निफाडचा पारा 2 अंशांनी घसरला नाशिकमध्ये देखील तापमानाचा पारा घसरलाय. नाशिकचे तापमान 10.8 तर पोहचले आहे. तर निफाडमध्ये पारा 9.5 अंशावर असल्याची नोंद झालीय. गेल्या 24 तासात नाशिक आणि निफाडचा पारा 2 अंशांनी घसरलाय. दरम्यान, अचानक पारा घसरल्याने निफाडमध्ये ठीक ठिकाणी शेकोटी पेटायला लागल्या असून गुलाबी थंडीचा आनंद घेत विद्यार्थी शाळा महाविद्यालयात जात आहेत.
आज कोणत्या जिल्ह्यात किती तापमान ? (सकाळी 8.30 पर्यंत min temp)
मुंबई - 19 अंश सेल्सिअस
कुलाबा - २२ अंश सेल्सिअस
सातारा - 13.6 अंश सेल्सिअस
महाबळेश्वर- 12. 3 अंश सेल्सिअस
बीड - 11.5 अंश सेल्सिअस
पुणे - 13.2 अंश सेल्सिअस
रत्नागिरी - 19 अंश सेल्सिअस
संभाजीनगर - 11.8 अंश सेल्सिअस
नाशिक - 10.8 अंश सेल्सिअस
नवी मुंबई - 23.6 अंश सेल्सिअस
माथेरान - 15. 4 अंश सेल्सिअस
धाराशिव - 14.6 अंश सेल्सिअस
कोल्हापूर - 17.1 अंश सेल्सिअस
अहिल्यानगर - 11.3 अंश सेल्सिअस
सांगली - 14.4 अंश सेल्सिअस
नंदुरबार - 12.3 अंश सेल्सिअस
परभणी - 14 अंश सेल्सिअस
जेऊर - 9 अंश सेल्सिअस
बारामती - 12.6 अंश सेल्सिअस
नागपूर - 12.2 अंश सेल्सिअस
आणखी वाचा