Bigg Boss 19 Abhishek Bajaj Eviction Pranit More: 'बिग बॉस 19'मध्ये (Bigg Boss 19) रविवारी न भूतो न भविष्यती एविक्शन पाहायला मिळालं. बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19 Show) 'वीकेंड का वार'मध्ये प्रणीत मोरेची (Pranit More) एन्ट्री झाली आणि त्यासोबतच त्याला काही विशेष अधिकार मिळाले. घरातील नॉमिनेटेड सदस्यांपैकी प्रणीतला एकाला वाचवणं शक्य होतं. बॉटम 3 मध्ये असलेल्या सदस्यांपैकी प्रणीतनं अशनूर कौरला सेफ केलं. त्यानंतर 'बिग बॉस 19'च्या घरात आजवरचं सर्वात शॉकिंग डबल एविक्शन झालं. अभिषेक बजाज (Abhishek Bajaj) आणि नीलम गिरी (Neelam Giri) दोघेही घराबाहेर आले. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. अभिषेकचं घराबाहेर (Abhishek Bajaj Eviction) पडणं चाहत्यांना फारसं आवडलं नाही आणि त्यांनी शोच्या निर्मात्यांवर संताप व्यक्त केला.
या आठवड्यात, 'बिग बॉस 19'मध्ये पाच स्पर्धकांना बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलेलं. यामध्ये गौरव खन्ना, फरहाना भट्ट, अशनूर कौर, अभिषेक बजाज आणि नीलम गिरी यांचा समावेश होता. होस्ट सलमान खाननं जाहीर केलं की, फरहाना भट्ट आणि गौरव खन्ना सुरक्षित आहेत. यामुळे अशनूर, अभिषेक आणि नीलम हे बॉटम तीनमध्ये राहिले.
प्रणीतनं अशनूरला सेफ केलं अन्...
त्यानंतर सलमान खाननं म्हटलं की, प्रणीत मोरेकडे विशेष अधिकार आहे आणि तो यापैकी एकाला वाचवू शकतो. कारण गेल्या आठवड्यात तो कॅप्टन होता आणि मेडिकल रिजनमुळे घराबाहेर आलेला. पण आता तो त्याचा विशेष अधिकार वापरू शकतो. यानंतर प्रणीत म्हणाला की, तो घेत असलेल्या निर्णयामुळे धक्का बसू शकतो... यानंतर त्यानं अशनूरचं नाव घेत, तिला सेफ केलं. त्यानंतर डबल एविक्शन असल्यामुळे अभिषेक आणि नीलम घराबाहेर पडले.
प्रणीतच्या निर्णयानं संतापले फॅन्स
प्रणीत मोरेनं अशनूरला सेफ करण्याचा जो निर्णय घेतला, तो चाहत्यांना फारसा आवडला नाही. चाहते प्रणीतवर चिडले आणि त्यांनी आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली. सध्या ट्विटरवर अभिषेकचं नाव ट्रेंड करत आहे. प्रणीतनं घेतलेला निर्णय चुकीचा आहे आणि त्यानं अभिषेकला वाचवायला हवं होतं, असं सर्वांचं म्हणणं आहे. अभिषेकनं दोन महिन्यात प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे तो ट्रॉफीच्या रेसमध्ये टिकायला हवा होता.
अभिषेकसाठी चाहत्यांचे ट्वीट्स
'ऑडियंस का विनर' अभिषेक बजाज
प्रणीत मोरेवर चाहत्यांचा संताप
प्रणित मोरेवर प्रेक्षक संतापले आहेत. प्रणीतनं फसवणूक आणि विश्वासघात केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. प्रणीतनं शोमध्ये अभिषेक मित्र असल्याचं नाटक केलं. त्यानं आपल्याच मित्राच्या पाठीत खंजीर खुपसलाय अशा अनेक कमेंट्स चाहत्यांकडून केल्या जात आहेत.