Horoscope Today 10 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 10 नोव्हेंबर 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज व्यवसाय असो किंवा नोकरी जिथे काम कराल, तेथील वातावरण आनंददायी राहिल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज सहवासातील वयस्कर व्यक्तींचे ऐकावे लागेल, आवडत्या व्यक्तींचा सहवास मिळेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे अनेक कामे मार्गी लागतील, यंत्रसामग्रीवर काम करताना सावधगिरी बाळगा
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रकृती स्वास्थ्यासाठी पैसा खर्च करावा लागेल, नुसतं बोलण्यापेक्षा कृतीत आणलं तर वर्तमान चांगला होईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज नको त्या गोष्टीवर विचार करून वेळ घालवणे आवडणार नाही
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज मुलांची मते पटली नाहीत तरी गप्प बसाल, जोडीदाराची यामुळे चिडचिड होईल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज आंतरिक बळ चांगले मिळणार आहे, आर्थिक स्थिती सुधारेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जुनी येणी वसूल होतील, डोळ्यांच्या विकारांपासून सावधान
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज चित्रकलेची आवड असणाऱ्यांचा मूड चांगला असेल, वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज भावनांचा कोंडमारा अथवा परिस्थितीमुळे होण्याची शक्यता आहे, त्यामुळे एकलकोंडे बनाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज महिला जरा जास्तच काटकसरी बनतील, सहजासहजी स्वतःच्या कोणत्याच गोष्टींचा ताबा सोडणार नाही
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज आर्थिक आणि सामाजिक दर्जा सुधारेल, तुमच्या अस्तित्व जगाला दाखवण्यात गुंतून जाल
हेही वाचा
Rahu Transit 2025: 'राहू' ची शांतीत क्रांती, डिसेंबरमध्ये 3 राशींना अचानक करणार मालामाल! नक्षत्र परिवर्तन देणार मोठ्ठं सरप्राईझ, धनलाभ, भरभराट, तुमची रास?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)