Maharashtra Weather Update : राज्यभरात अनेक ठिकाणी तुफान पाऊस झाला असून, पावसामुळे झालेल्या नुकसानाला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. सांगली, सातारा, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि अहमदनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीत पाणी साचले आहे. यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतकरी "आम्ही आता कसं जगायचंय? कर्ज काढून हे सगळं केलं," असे म्हणत आहेत. माण खटाव तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, धाराशिवमध्ये तब्बल दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, शासनाकडे 191 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात कांदा पीक पाण्यात गेले आहे. अहमदनगरच्या खडकी गावात एका शेतकऱ्याने शेतातच पाण्यात बसून सरकारचा निषेध केलाय. तर तिकडे यवतमाळ आणि लातूरमध्येही पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. लातूरच्या काटेजवळगा भागात एक व्यक्ती नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. तर मराहावड्यातील अनेक भजगत आजही (22 सप्टेंबर रोजी) पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. कृषिमंत्र्यांनी "शंभर टक्के शेतकऱ्यांची अजिबात चूक नाहीये. निसर्गाचं संकट आहे," असे म्हटले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांना आहे.
बीडच्या शिरूर कासार शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस, बाजारपेठेत पाणी शिरले
विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला झोडपून काढले. शिरूर कासारमध्ये दमदार पाऊस झाला असून सिंदफना नदीला पूर आला आहे. आणि याच पुराचे पाणी परिसरातील घरांमध्ये, दुकानांमध्ये शिरले आहे. शिरूर शहरातून वाहणाऱ्या सिंदफणा नदीने रौद्ररूप धारण केले असून तहसील प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मध्यरात्री अचानक दमदार पाऊस झाला आणि त्यामुळे ही पूरसदृश्य परिस्थिती दिसून येते आहे. घरांसह नदीकाठचे दुकानं सध्या पाण्यात आहे. सुदैवाने कसलीही जिवितहानी झाली नाही.
मांजरा धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गात वाढ
गेल्या काही दिवसात धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला होता. मात्र मांजरा धरणात होत असलेली पाण्याची आवक पाहता आता धरणाचे एकूण सहा वक्री दरवाजे उघडण्यात आले असून. मांजरा नदीपात्रात 17333 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे.रविवारी मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले होते. आज गेट क्रं 1 ते 6 उघडत नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला असल्याने मांजरा नदी काठावरील नागरिकांना खबरदारीचे आव्हान प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
धाराशिवच्या भूम आणि परांडा तालुक्यात पावसाचा हाहाकार
चांदणी नदीने रौद्ररूप धारण केले असून चावडी शाळा व घराघरात पाणी साचले आहे, यामुळे गावकऱ्यांच्या नुकसान झाले असून, घराघरात पाणी सुचल्या जीवनावश्यक वस्तूचे होते नुकसान झाले असून मोठे नुकसान झाले आहे. शेती पिकांचे हे अतोनात नुकसान झाले असून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी ही करण्यात येत आहे. शिरसाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे नदीला महापूर आल्यामुळे नदीच्या पलीकडे जवळपास 200 -300 लोक अडकलेले आहेत.
ही बातमी वाचा: