Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष कामाला लागला असून स्थानिक पातळीवर सर्वस्थरातील कार्यकर्ते जोमाने तयारी करताना दिसून आले आहेत. अशातच आता उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यात पुढेही शक्ती प्रदर्शन, सभाच्या नियोजनासाठी सर्वात जास्त लागतात त्या खाजगी गाड्या. त्यामुळेच खाजगी गाडी चालकांना सध्या अच्छे दिन आले आहेत.


या दरम्यानच्या काळात पुढचा महिना भर खाजगी गाड्या नेत्यांकडून बुक करण्यात आल्या आहेत.  जास्तीत जास्त माणसे, समर्थक बसून आणण्यासाठी मोठ्या गाड्यांना पसंती दिली जातेय. ज्यात स्कॉर्पिओ, क्रूझर, इर्टीगा, इनोवा इत्यादि गाड्यांना जास्त मागणी आहे. त्यातच गाड्या कमी असल्याने या खाजगी वाहनचालकांनी दर वाढवले आहेत.


निवडणुकीत कोणत्या गाड्यांचे भाव किती? 



  • स्कॉर्पियो आधी 2 आता 3 हजार रुपये रोज 10 किलोमीटर प्रति लिटर एव्हरेज 

  • क्रुझर आधी 12 ते 1500 आता 2 हजार रुपये रोज आणि 10 किलोमीटर प्रति लिटर एव्हरेज 

  • इर्टीगा आधी 1200 ते 1500 आता 2000 रुपये रोज आणि 10 किलोमीटर प्रति लिटर एव्हरेज 

  • इनोवा आधी 2000 ते 2500 आता 4 ते 5 हजार रुपये रोज आणि 10 किलोमीटर प्रति लिटर एव्हरेज


निवडणुकीच्या तारखांसबंधी काही इंटरेस्टिंग गोष्टी


- महाराष्ट्रात मंगळवारपासून (15 ऑक्टोबर) आचारसंहिता लागू.


- 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल.


- म्हणजेच, 15 व्या विधानसभेचे आणि महाराष्ट्राचे नवीन कारभारी 23 नोव्हेंबरला ठरणार. 


- या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर अशी आहे. 


- 26 ऑक्टोबरला शनिवार तर 27 ऑक्टोबरला रविवार असल्यामुळे, 22 ते 25 आणि 28 ते 29 असे सहा दिवसच अर्ज भरण्यासाठी वेळ असेल. 


- याचाच अर्थ अर्ज भरण्यासाठी आजपासून उरले अवघे 14 दिवस. 


- तसेच, छाननी 30 ऑक्टोबरला तर अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत असेल. 


- याचाच अर्थ, दिवाळीमुळे अर्ज मागे घेण्यासाठी जादा वेळ असणार. 


- एकूणच, उमेदवारांना यावेळी प्रचारासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. 


- 18 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे प्रचारासाठी जवळपास एक महिना मिळणार आहे. 


- आजपासून 39 दिवसांत महाराष्ट्राची निवडणूक आटोपणार. 


- अर्जांची छाननी ते माघारीत 4 दिवसांचा वेळ. 


- कुणी बंड केल्यास, त्याला समजवण्यासाठी  4 दिवसांचा वेळ मिळणार. 


असे असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक -



  • निवडणुकीचं नोटिफिकेशन :  22 ऑक्टोबर 2024

  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 

  • अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024

  • अर्ज मागे घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर 

  • मतदान  : 20 नोव्हेंबर 2024

  • मतमोजणी : 23 नोव्हेंबर  2024


ही बातमी वाचा :