Maharashtra News LIVE Updates: राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पुण्यात आपल्याला ऐन हिवाळ्यात पावसाळा असल्यासारखं वाटत आहे आणि त्याचं कारण म्हणजे, पुण्यात सकाळपासून पडणारा रिमझिम पाऊस. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे, राज्यासह पुण्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण आज आणि उद्या बघायला मिळणार आहे. उत्तरेकडून येणारे वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या आद्रतेमुळे महाराष्ट्रभर ढगाळ वातावरण तयार झालं आहे आणि परिणामी पुण्यात देखील पाऊस पडतोय. किमान तापमानात देखील 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होऊ शकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नाशिकमध्ये एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची तयारी सुरू असतांनाच दुसरीकडे गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. नाशिकच्या देवळाली गाव परिसरात पहाटेच्या सुमारास टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी घराबाहेर उभ्या केलेल्या 6 ते 7 वाहनांची हत्यारं आणि दगडांनी तोडफोड करण्यात आली. दोन गटातील जुन्या भांडणातून हे कृत्य केल्याचा संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. शहरभर चोख पोलीस बंदोबस्त तैनात असताना ही घटना घडल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
वसईत मिक्सर बनवणाऱ्या जयपान कंपनीला आग लागली आहे. वसईच्या कामन परिसरातील मिक्सर बनवणारी जयपान कंपनी आगीत जळून खाक झाली आहे. सकाळी चारच्या सुमारास अचानक आग लागल्याने जयपान कंपनीतील मिक्सर बनवण्याच्या साहित्यासह कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आग इतकी भीषण होती की त्या आगीतून धुराचे मोठमोठे लोळ पसरत होते. या आगीचे कारण अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेचे अग्निशम दल घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
बार्शी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. बार्शी तालुक्यातील शेळगाव, वैराग,पानगाव, उपळे परिसरात पहाटे अवकाळी पावासाने हजेरी लावली. ऐन काढणीला आलेला कांदा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Sangli Crime News: अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी एकाच गुन्ह्यामध्ये आरोपीला 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील आश्रम शाळेतील हे प्रकरण आहे. एकाच गुन्ह्यामध्ये आरोपीला चार वेळा जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. इस्लामपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने संस्थाचालकासह दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. संस्थाचालक अरविंद आबा पवार आणि सहायक कर्मचारी मनिषा चंद्रकांत कांबळे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. अत्याचार झालेल्या चार पीडित मुलींना प्रत्येकी 50 हजार तर विनयभंग झालेल्या दोन पीडित मुलींना प्रत्येकी 5 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये घ्या...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -