harshvardhan jadhav on raosaheb danve: माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील कौटुंबिक वाद काही नवीन नाही. त्यातच आता दानवे यांनी आपल्यावर  अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. तर आपल्याला मारून टाकले किंवा जेलमध्ये सुद्धा टाकले तरीही स्वाभिमान कधीच गमवणार नाही,असा इशारा जाधव यांनी दानवे यांना दिला आहे. याबाबत जाधव यांनी एक व्हिडिओ जारी केला असून, त्यातून त्यांनी दानवे यांच्यावर अनेक आरोपही केले आहेत. 


जाधव यांनी पोस्त केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटल आहे की, रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मला त्यांना एकच सांगायचं आहे, यावर न्यायालयात जे काय व्हायचं ते होणारच आहे. सगळं काही विषय न्यायालयात येणारच आहे. पण आपल्याला जर वाटत असेल की, हर्षवर्धन झुकेल आणि आपल्या पायाशी लोटांगण घेईल तर असे होणार नाही. त्यामुळे मी मरण पसंद करील, जेलमध्ये जायला तयार आहे, पण स्वाभिमान कधीच गमवणार नाही. आपण मंत्री आहात, मोठ्या पदावर आहात, वाटेल ते केलं आहे आणि करणार आहात. मला सगळं माहित आहे. पण स्वाभिमानाचा झेंडा मी कधीच सोडणार नाही. आम्हीपण लखोजी जाधवांचे वंशच आहोत सोपं नाही,असं जाधव म्हणाले आहेत. 


दानवेंवर गंभीर आरोप... 


माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यातील कौटुंबिक वाद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. जाधव यांच्याकडून दानवे यांच्यावर अनेकदा गंभीर आरोप सुद्धा करण्यात आले. मात्र दानवे सहसा या सर्व प्रकरणावर किंवा जाधव यांच्या आरोपांवर बोलण्यास टाळतात. गेल्या काही वर्षांपासून हर्षवर्धन व त्यांची पत्नी या वेगवेगळे राहतात. मात्र त्यांच्या मुलगा आदित्य आपल्या वडीलांसोबत राहतो. तर आपली संपती मुलगा आदित्याच्या नावावर करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. पण नातावाच्या नावावर संपती होऊ नयेत म्हणून, दानवे यांच्याकडून विरोध होत असल्याच जाधवांकडून सांगण्यात आले आहे.