Maharashtra Medical Council : महाराष्ट्र राज्य वैद्यक परिषदेने (Maharashtra Medical Council-MMC) मोठा निर्णय घेत राज्यातील ज्या होमिओपॅथी डॉक्टरांनी (Homeopathy Doctors) मॉडर्न फार्माकोलॉजीचा अर्थात सीसीएमपीचा (CCMP) कोर्स पूर्ण केला आहे, अशा होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी आता महाराष्ट्र राज्य वैद्यक परिषदेच्या नोंदणी पुस्तकात होणार आहे. यामुळे राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी औषधांची प्रॅक्टिस करण्याची परवानगी नव्हती. मात्र राज्य सरकारने या डॉक्टरांना आधुनिक फार्म्याकॉलॉजीचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर ऍलोपॅथी औषधांची प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनकडून विरोध होण्याची शक्यता
दरम्यान, या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने विरोध केला होता. मात्र काल (30 जून) महाराष्ट्र वैद्यक परिषदेने परिपत्रक काढत राज्यातील सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंदणी आता महाराष्ट्र वैद्यक परिषदेत होणार आहे. यामुळे राज्यातील लाखो होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. मात्र या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन विरोध करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अल्प वयात नवीन गोष्टी आत्मसात करणं वाढलेल्या वयापेक्षा जास्त सोपं- डॉ. निखिल पांडे
बाल वयात मेंदूची "न्यूरो प्लास्टिसिटी" सर्वाधिक असते, बाल वयात मेंदू लवचिक आणि विकसनशील अवस्थेत असल्यामुळे नवीन गोष्टी, नवीन भाषा शिकणे सोपे ठरते असे मत बाल मानसोपचार तज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, जसे जसे वय वाढत जाते मेंदूतील मज्जातंतू विकसित होण्याची गती कमी होते, त्यामुळे अल्प वयात नवीन गोष्टी, नवीन भाषा आत्मसात करणं वाढलेल्या वयापेक्षा जास्त सोपं ठरतं असं मत नागपूरचे प्रख्यात बाल मानसोपचार तज्ञ डॉ निखिल पांडे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, प्राथमिक शिक्षणात सर्वाधिक भर मातृभाषेवरच असायला हवं कारण क्लिष्ट संकल्पना आत्मसात होणे मातृभाषेमध्येच जास्त सोप्यारीत्या शक्य होते असे ही तज्ञांना वाटतंय... तिसरी भाषा शिकताना कोवळ्या विद्यार्थ्यांवर मानसिक ताण पडणार असेल, तर तिसरी भाषा हसतखेळत शिकवण्याचे आणि त्यात ही परीक्षा न घेण्याचे निर्णय ही घेता येऊ शकते, मात्र फक्त त्या कारणामुळे नवीन भाषा शिकवूच नये हे योग्य नसल्याचे तज्ञांना वाटतंय.. नवीन भाषा शिकण्याचे फायदे कोवळ्या वयासह उतार वयात ही मिळतात.. उतार वयात नवीन भाषा शिकल्यामुळे डीमेन्शिया म्हणजेच स्मृतीभ्रंशची गती कमी करता येते किंवा ते टाळता येते... त्यामुळे कोणत्याही वयात नवीन भाषा शिकणे बुद्धीला तल्लख ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे मानसोपचार तज्ञांचे म्हणणे आहे.
इतर महत्वाच्या बातम्या