Maharashtra Cabinet Decision मुंबई : नागपूर (Nagpur) आणि अमरावती(Amravati)विभागातील निवासी वापरासाठी दिलेल्या नझुल जमिनींसाठीच्या विशेष अभय योजनेला आणखी एक वर्षाकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
दरम्यान, नागपूर आणि अमरावती विभागातील भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनी संदर्भातील मुद्यांबाबत सर्वकष अभ्यास करुन विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने शासनास अहवाल सादर केला आहे. त्यानुसार विशेष अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून मागणी करण्यात येत होती. ज्या भाडेपट्टेदारांना या योजनेमध्ये आतापर्यंत विविध कारणांसाठी भाग घेता आला नाही, अशा सर्व भाडेपट्टेदाराना या योजनेत सहभागी होण्याची संधी प्राप्त व्हावी, यासाठी या योजनेस एक वर्ष मुदतवाढ देण्यात येत आहे.
दरम्यान, या विशेष अभय योजनेस 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2026 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. ही योजना ज्या नझुल जमिनी निवासी वापरासाठी लिलावाद्वारे-प्रिमियम अथवा अन्य प्रकारे भाडे तत्त्वावर देण्यात आलेल्या आहेत, त्यांनाच लागू राहील. विशेष अभय योजना समाप्तीनंतर 1 ऑगस्ट 2026 पासून शासन निर्णय दि. 23 डिसेंबर 2015 आणि शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2019 च्या तरतूदी लागू राहतील.
गणेशोत्सवानिमित्त आम्ही शासन निर्णय जाहीर केला- चंद्रशेखर बावनकुळे
कोकणात वेंगुर्ल्याला गणेशोत्सवानिमित्त आम्ही शासन निर्णय जाहीर केला, गवळी कोड्याचा फ्रीहोल्ड झालेला आहे. तसेच नागपूर आणि अमरावती सरकारी जागेवर लोक राहतात त्यांना अजून जागेवर आहे ते कायदेशीर करण्याकरता नझुलच्या जागेवर बसलेल्या घरांना त्याच्या जागेचे मालकी पट्टे देण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढ दिली आहे. नागपूर आणि अमरावती विभागात सरकारी जागेवर अजून च्या जागेवर पट्टे असतील त्यांना पट्टे वाटप करणार, गणेशोत्सवाच्या दिवशी मुख्यमंत्री आणि सरकारने हा निर्णय घेतला आहे. अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या