Maharashtra Assembly Election 2024 : सहकार क्षेत्राचा बालेकिल्ला आणि साधुसंतांची भूमी म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे नाव घेतले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला हा जिल्हा राज्याच्या राजकारणातही महत्वाचा मानला जातो. त्यामुळे अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघ नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. सध्या अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत संग्राम जगताप यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडी कोणता डाव टाकणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. एकीकडे महायुतीचे अनेक ठिकाणी उमेदवार ठरले असतानाच महाविकास आघाडीच्या गोटात मात्र गोंधळ पाहायला मिळत आहे. असेच चित्र अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघात दिसत आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचे शहरातील प्रत्येक चौकात आणि प्रत्येक रस्त्यावर "विश्वास जुना संग्रामभैय्या पुन्हा" असा आशयाचे बॅनर झळकत आहेत. त्यामुळे संग्राम जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र अद्याप कोणालाही उमेदवारी दिलेली नाही, त्यामुळे अहदनगर शहरावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


अहमदनगर शहर विधानसभेत 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी- भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम अरुण जगताप 81,217 मतांनी विजयी झाले (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) होते.अनिल रामकिसन राठोड यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संग्राम जगताप यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. 


त्याआधी म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर शहरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेच गुलाल उधळला होता. यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप 49 हजार 378 मतांनी विजयी झाले होते. तर अनिल राठोड यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता या  निवडणुकीत पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळून हॅट्ट्रीक साधणार की  मविआकडून शरद पवार शह देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हे ही वाचा -


Akole Assembly Constituency : विधानसभेची खडाजंगी : घड्याळ विरुद्ध तुतारीचा सामना रंगणार; कोण मारणार बाजी


Sangamner Assembly Constituency : विधानसभेची खडाजंगी : बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला भेदण्याचा सुजय विखेंचा निर्धार, लढाईत कोण बाजी मारणार?