पुणे : मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी (OBC) नेत्यांच्या बैठकीला बोलावले नसल्यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) नाराज आहेत. परिणामी ते आज (5 ऑक्टोबर ) जेजुरीमधून (Jejuri) आंदोलनाची हाक देणार आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाचा मेळावा जेजुरी येथे होणार आहे. OBC लढ्यासाठी (OBC Reservation) जेजुरीगडावर येण्याचे आवाहन लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या OBC नेत्यांच्या बैठकीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना (Devendra Fadnavis) इशारा दिला आहे की, 'जातीवादी लोकांचं ऐकू नये, अन्यथा परिणाम गंभीर होतील'. या घडामोडींमुळे राज्यातील OBC राजकारण तापले आहे. दोन्ही नेत्यांच्या भूमिकांमुळे OBC आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) पुढील काळात महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. या परिस्थितीवर आता सरकार नेमकं काय भूमिका घेतं याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.
जेजुरीगडावर ओबीसी आंदोलनाची तळी उचलणार (Laxman Hake OBC Agitation in Jejuri)
मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलवलं नसल्याने नाराज लक्ष्मण हाके यांनी जेजुरीतून आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्यभरातून समाज बांधव जेजुरीत दाखल होणार असल्याचे सांगितलं जातंय. हजारो तरुणाने ओबीसी लढ्यासाठी जेजुरी गडावर येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याला आता कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लक्ष्मण हाके आज जेजुरी गडावर ओबीसी आंदोलनाची तळी उचलणार आहेत. तर आपल्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन आंदोलनाची तळी उचलू या, असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी तरुणांना केलं आहे.
OBC Reservtion : OBC नेत्यांची बैठक निष्फळ, 10 ऑक्टोबरच्या मोर्चावर ठाम
मुंबईमध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षण जीआरवरून छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले. OBC नेत्यांनी हा GR रद्द करण्याची मागणी केली आहे. बैठकीनंतरही OBC नेत्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे 10 ऑक्टॉबर रोजी होणाऱ्या सकल OBC समाजाच्या मोर्चावर हे नेते ठाम आहेत. "हा GR रद्द करण्याची मागणी OBC नेत्यांनी केली आहे" आणि "10 ऑक्टोबरला होणाऱ्या सकल OBC समाजाच्या मोर्चावर हे नेते ठाम आहेत" असे त्यांचे म्हणणे आहे. या बैठकीवरून मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर टीका केली आहे. OBC समाजाच्या मागण्या आणि त्यांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: