लातूर : 2014 पूर्वी मराठवाड्याचे रेल्वे बजेट हे चौदाशे कोटी रुपये इतकेच असायचे, 2014 नंतर मराठवाड्यासाठी रेल्वे बजेट हे खूप वाढलं. आता बारा हजार कोटी रुपयांचा निधी मराठवाड्यासाठी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.  लातूरकरांच्या अनेक मागण्या असतात, रेल्वेमंत्री होऊन मी दीडच वर्षे झालेला आहे. तुमच्या प्रस्तावित अनेक मागण्यांपैकी काही मागण्या या टर्ममध्ये मंजूर करतोय, तर काही मागण्या या 2024 नंतर पुढील सरकारमध्ये मंजूर करू, त्यावेळेसही रेल्वेमंत्री मीच असणार आहे अशी मिश्किल टिपणी रावसाहेब दानवे यांनी लातूरमध्ये बोलताना केली आहे.


रावसाहेब दानवे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. अंबुलगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना तीस वर्षाच्या भाडेतत्त्वावर ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड ने चालवायला घेतला आहे. या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट सीएनजी प्रोजेक्ट आणि सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी ते आले होते. यावेळी बोलताना त्यांनी लातूर आणि जालना तसेच लातूरकरांच्या मागण्या यावर मिश्किल टिपणी केली आहे.


लातूरकर खरेच भाग्यवान आहेत, कोच फॅक्टरी, वंदे भारत ट्रेन अशा अनेक गोष्टी त्यांच्यासाठी सहज शक्य आहेत. मराठवाड्यातील सुधारलेले जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे तर जालना हा मागासलेला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे सरकार असल्याकारणाने शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल असेही रावसाहेब दानवे यावेळी बोलताना सांगितलं.


ओंकार साखर कारखाना परिसरात मराठवाड्यातील सर्वात मोठा इथेनॉल निर्मिती प्रकलपचा तसेच सेंद्रिय खत नि्मिती आणि सी एन जी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे याच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे.


जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील ओमकार साखर कारखाना प्रा ली युनिट 02 येथे हा सोहळा संपपन झाला आहे. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, संभाजी पाटील निलंगेकर आणि भाजपातील इतर ही भाजपा पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.


दीड लाख लिटर इथेनॉल 15 टन सी एन जी त्यातून मग सेंद्रिय खतचे निर्मिती करन्यात येणार आहे. उसाचे बिल अवघ्या पंधराव्या दिवशी देणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. या वर्षी 2500 रुपये भाव दिला आहे. या पुढील हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक भाव आणि इथेनॉल प्रक्लप सुरू झाल्यावर अतिरिक्त दोनशे रुपये आम्ही देणार आहोत असा शब्द ओंकार साखर कारखाना प्रा चे बोथरे पाटील यांनी दिला आहे. 


डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना मागील बारा वर्षा पासून बंद होता. तो पुढील तीस वर्षाच्या लिजवर ओंकार साखर कारखाना प्रा. लिमिटेडने चालवण्यासाठी घेतला आहे. यावर्षी काही काळ साखर कारखाना चालविण्यात आला होता. 2500 रुपयाचा भाव देण्यात आला आहे. या साखर कारखान्यामुळे तालुक्यातील राजकारणास वेगळी गती मिळत आहे. आमदार अमित देशमुख यांनी हा कारखाना चालविण्यासाठी घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांच्यावर मात करत स्वतःच्या मर्जीतील व्यक्तीस कारखाना चालवण्यास देण्यात यश मिळविले आहे.