लातूर : लातूर (Latur)  जिल्ह्यातील उमरदरा या गावात मुक्कामाची बस (Bus Fire) अज्ञातांनी जाळली. जळकोट तालुक्यातील उमरदरा या गावात मुक्कामी बस येत असते. काल मध्यरात्रीनंतर अज्ञातांनी ही बस पेटवून दिली. यावेळी बसमध्ये वाहक आणि चालक झोपले होते. त्यांनी कसाबसा स्वतःचा जीव वाचवला आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. ही बस पेटवण्याचं नेमकं कारण काय, कोणी पेटवली, याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही. पोलीस या घटनेचे तपास करत आहेत. 


लातूर जिल्ह्यातील उंबरदरा हे गाव जळकोट तालुक्यातील गाव आहे. दररोज उदगीर आजाराची मुक्कामाची बस इथे साडेनऊ ते दहाच्या दरम्यान दाखल होत असते.रविवारी ही बस गावाजवळ आल्यानंतर फेल झाली. गाव जवळ असल्या कारणाने प्रवासी उतरून घराकडे निघून गेले. वाहक आणि चालकांनी बस फेल असल्याची माहिती उदगीर आगाराला कळवली होती. बसमध्ये झोपलेले वाहक आणि चालक मध्यरात्री खडबडून जागे झाले. बसच्या समोरील बाजूस मोठा आवाज होऊन बसने पेट घेतला होता. काही लक्षात येण्याच्या आताच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.


बसमध्ये आग कशी लागली?


बसला आग लागल्याची माहिती वाहक आणि चालकांनी उदगीर आगारला कळविली.  जवळच्या पोलीस स्टेशन जळकोटला माहिती देण्यात आली.  जळकोट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. जळकोट येथील अग्निशमन दलाची गाडी तांत्रिक बिघाडामुळे येऊ शकली नाही.  अग्निशमन दलाची गाडी अहमदपूरवरून मागवण्यात आली. आग विझवण्यात यश आली मात्र  बसला आग कशी?  लागली हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. बस सकाळी साडेनऊ वाजता फेल झाली. त्यावेळी  बस गावाबाहेरच उभी होती. रात्री दीड वाजता अचानक बसमध्ये आग कशी लागली? बसमध्ये शॉर्ट सर्किट झालं असाव असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  


नांदेड येथील विशेष पथक करणार तपासणी


या संदर्भात एसटी महामंडळाचे लातूर आगार प्रमुख जानराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार "मध्यरात्री बसला आग लागली मात्र ती कोणत्या कारणामुळे लागली याचा तपास सध्या सुरू आहे.  नांदेड येथील विशेष पथक याची तपासणी करणार आहे त्यानंतर याबाबत ठोस माहिती देण्यात येईल. हनुमंत गित्ते यांच्या शेत घटनास्थळ बाजूलाच  घटना घडली आहे.  त्यावेळेस ते आपल्या शेतात झोपले होते. आग लागल्यानंतर आवाज ऐकून मी घटनास्थळी दाखल झालो. बसचे वाहक आणि चालक प्रचंड भिजलेल्या अवस्थेत होते. बसच्या समोरील बाजूस मोठे आवाज येत होते.  बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना दिसली. मात्र आग का लागली हे स्पष्ट झाले नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे.


आग कशामुळे झाली या बाबत स्पष्टता नाही


उमरदरा या गावातील शिवशंकर लांडगे यांच्या माहितीनुसार, आग कशामुळे लागली हे स्पष्ट नाही. ही गाडी रोज रात्री दहा वाजता आमच्या गावात मुक्कामी येत असते. गाडी काल ब्रेक फेल झाल्यामुळे गावाबाहेरच थांबून होती आणि बसला आग लागली. एसटी महामंडळातील तंत्रज्ञ आणि तज्ञ घटनेचा अभ्यास करत आहेत. अद्याप ती कोणत्याही निष्कर्षावर आले नाहीत.  त्यामुळे बस फेल झाली बस जळाली हे खरं आहे.  मात्र कशामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे.


हे ही वाचा :


धक्कादायक! दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मुलानेच बापाला पेटवून दिले; परभणी जिल्ह्यातील संतापजनक प्रकार