Agriculture News in Latur : यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी (Rain) झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक या पावसामुळं वाया गेली आहेत. लातूर (Latur) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे प्रत्यक्षात 100 टक्के नुकसान झाले असताना कागदपत्रात 90 टक्के नुकसान झाल्याचे दाखवले आहे. अशात शेतकऱ्यांनी पीक विमा (Crop Insurance) देखील तुटपुंजाच मिळाला आहे. याविरोधात शेतकरी एकवटले असून, त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी (District Agriculture Office) कार्यालयात ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.
Farmer Agitation : गातेगाव परिसरातील 200 शेतकरी एकत्र
लातूर (Latur) जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी (Rain) झाल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप मोठं नुकसान झालं होतं. कृषी अधिकारी (Agricultural Officer) आले त्यांनी पंचनामेही केले. पीक विमा कंपनीचे अधिकारीही आले. नुकसान पाहून 80 टक्क्यांच्या पुढील नुकसानीची नोंदणी करण्यात आली. या शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र अनेक शेतकऱ्यांना किरकोळ रक्कम मिळाली. या विरोधात गातेगाव (Gategaon) परिसरातील 200 शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) पदाधिकारी यांनी एकत्र येत जिल्हा कृषी अधिकारी यांचे कार्यालय गाठले. निवेदन देण्यासाठी शेतकरी येणार आहेत, याची पूर्वकल्पना दिल्यानंतरही अधिकारी गैरहजर राहिले. यामुळं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही तुटपुंजी मदत
खरीप हंगाम 2022 मध्ये गातेगावातील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे विमा भरला होता. त्यानंतर अतिवृष्टी, गोगलगाय यासारखी अनेक संकट शेतकऱ्यांच्या पिकावर आली. शेतकऱ्यांनी विमा कंपनीला माहिती दिल्यावर विमा कंपनीचे प्रतिनिधी गावात आले होते. त्यांच्याकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामेही करण्यात आले. त्या पंचनाम्यात 85 ते 90 टक्के नुकसान दाखवून पंचनामे केले. पण प्रत्यक्षात विमा कंपनीनं बाधित क्षेत्राचा मुद्दा पुढे करून शेतकऱ्यांना तुटपुंज्या स्वरुपात मदत दिली आहे. हेक्टरी पाच ते सहा हजार रुपये मतद दिली आहे. ही मदत फक्त 20 टक्के शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. 80 टक्के शेतकरी त्यापासूनही वंचित आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: