Latur Railway Coach Factory : लातूर एमआयडीसी (Latur MIDC) भागामध्ये कोच फॅक्टरीची (Rail Coach Factory) निर्मिती करण्यात आली आहे. संपूर्ण काम झालेले आहे मात्र काही तांत्रिक कारणामुळे कोच निर्मिती सुरू होऊ शकली नाही. मागील काही महिन्यात हालचाली सुरू झाल्या असल्या तरी किती कालावधीनंतर कोच निर्मिती करण्यास सुरुवात होईल हे चित्र अद्याप स्पष्ट होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटनाची तारीख घोषित झाली तर प्रक्रिया वेगात पूर्ण होतील असे म्हटले जात आहे.
लातूर येथील कोचनिर्मिती करणारा देशातील चौथा कारखाना उभारण्यात आला आहे. दीड वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट 2021 मध्ये तो तयार होऊन कोच निर्मिती करण्यासाठी सक्षम आहे हे समोर ही आले होते. मात्र पुरेशा कुशल मनुष्यबळाअभावी या मराठवाडा कोच फॅक्टरीला अजूनही कोच निर्मितीची प्रतीक्षाच आहे. खासगी कंपनीशी करार केला जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाची तारीख घोषित झाली तर प्रक्रिया वेगात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
आताची स्थिती काय?
केंद्रीय स्तरावर या बाबत हालचाली सुरू आहेत. कोच कारखाना सुरू होईल त्यावेळी स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होईल असे सांगण्यात आले होते. मात्र आता केंद्र सरकारने या कारखान्यात खासगी कंपनीकडून कोचनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे आणि खासगी कंपनीत करार होईल त्यात 70:30 ह्या नुसार कामगार आणि कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे. 70 टक्के स्थानिक व 30 टक्के इतर ठिकाणचे कर्मचारी घेण्याचे संबंधित कंपनीस बंधनकारक करण्यात आले आहे.
का होत आहे विलंब?
कोच निर्मितीचे काम खासगी कंपनीस देण्यात येणार आहे. यात टेंडर आणि तांत्रिक प्रक्रियेमुळे प्रत्यक्षात अंतिम निर्णय होण्यास विलंब होत आहे. परंतु, आता मार्चअखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून एप्रिलपासून प्रत्यक्ष कोचनिर्मितीला प्रारंभ करण्यासाठी सूत्रे हलवली जात आहेत.
देशातील चौथा कारखाना लातुरात
देशात चार ठिकाणी रेल्वेच्या डब्यांची निर्मिती करणारे कारखाने आहेत. यात तामिळनाडू येथील चेन्नई, पंजाब येथील कपूरथळा, उत्तरप्रदेश येथील रायबरेली आणि लातूर येथील कारखान्यांचा समावेश आहे. यापैकी चेन्नई येथील कोच फॅक्टरी 1955 मध्ये तर कपूरथला येथील फॅक्टरी 1986 मध्ये उभारली गेली. रायबरेली येथे फॅक्टरी 2009 मध्ये स्थापन करण्यात आली. तरी प्रत्यक्षात डबे निर्मितीसाठी 2014 साल उजाडले. आता महाराष्ट्रात लातूर येथील मराठवाडा कोच फॅक्टरी उभारणी करून दोन वर्षे होत आली तरी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते
लातूर कोच फॅक्टरीचे काम हे अतिशय जलद गतीने पार पडलेले आहे. तितक्यात जलद गतीने इथे कोच निर्मिती करण्यासाठी सक्षम अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यासाठी रेल्वे प्रशासन काम करत आहे. खासगी कपनिशी करार ही झाला आहे. रेल्वेमंत्री आणि भाजपातील मी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोच फॅक्टरीचे उद्घाटन करावयाचे आहे. अधिकृतरीत्या ती तारीख जर मिळाली तर अवघ्या वीस दिवसांमध्ये सक्षमपणे कोच निर्मिती होऊ शकते अशी माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.
लातूर कोच फॅक्टरीची वैशिष्ट्ये
लातूर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर लातूर कोच फॅक्टरी आहे. 350 एकरवरील क्षेत्र आहे. यापैकी 120 एकरवरील पहिल्यापेक्षा बांधकाम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. पहिला फेजमध्ये एका महिन्यात 16 कोच निर्मिती शक्य आहे तर पहिल्या फेज मध्ये वर्षाला 250 कोच, दुसऱ्या फेजमध्ये वर्षाला 400 कोच आणि तिसऱ्या फेज म्हणजे वर्षाला 700 कोच निर्मिती करणारा अवाढव्य कारखान्याच्या पहिल्या फेजची तयार 100 टक्के पूर्ण झाली आहे. आता प्रतीक्षा आहे कोच निर्मिती कधी होईल याची प्रतीक्षा आहे.