कोल्हापूर : कोल्हापुरातील कसबा बावड्यातील शिवरायांचा पुतळा अनावरण आणि संविधान संमेलन दौरा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी अत्यंत दिमाखदारपणे करून  दाखवल्यानंतर आता महायुतीकडून सुद्धा येत्या बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी जंगी तयारी करण्यात येणार आहे. बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता तपोवन मैदानावर होत असलेला मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. 






दौरा नियोजनासाठी पार पडली बैठक 


दरम्यान, कोल्हापुरातील शेंडापार्कमधील 1100 खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन, जिल्हा बँक विस्तारित इमारतीचे उद्घाटन व मेळाव्याच्या नियोजनासाठी रविवारी कोल्हापुरात बैठक घेण्यात आली. मुश्रीफ यांनी सांगितले की, कोल्हापुरातील सामान्य माणसाला उपचारासाठी बाहेर जाण्याची गरज भासू नये, यासाठी प्रशस्त रुग्णालय मंजूर केलं आहे. विविध वैद्यकीय महाविद्यालये सुरू करत आहोत, इतकी चांगली आरोग्य सेवा पश्चिम महाराष्ट्रात कोठेही नाही. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत मेळावा होत आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते. 






विकासकामे सांगताना दम लागतो


गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी कोल्हापुरात आला आहे. ही कामे सांगताना दम लागतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत हीच कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.


इतर महत्वाच्या बातम्या