Hasan Mushrif on Sharad Pawar : भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी काल (4 सप्टेंबर) कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकातून तुतारी फुंकली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेतून शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता लाचार असा उल्लेख करत जागा दाखवणार असल्याचा निर्धार केला. तसेच समरजितसिंह घाटगे फक्त आमदार राहणार नसून त्यांना मंत्रिपद सुद्धा देणार असल्याचे सुतोवाच केले. लोकांच्या डोळ्यात भावना दिसत होती, असेही शरद पवार म्हणाले. 



दरम्यान, शरद पवार यांनी लाचार असा उल्लेख करत कागलच्या चौकातून गर्जना केल्यानंतर आता हसन मुश्रीफ यांनी (Hasan Mushrif on Sharad Pawar) शरद पवार यांना सवाल केला आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, माझ्या सहा निवडणुकींमध्ये आले तेव्हा नेहमी म्हणायचे की, राजा विरोधात प्रजा जिंकली पाहीजे. तेच मी पुन्हा म्हणत आहोत की, निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नही. समरजीत तेरी खैर नही. माझे म्हणणे काय जयंत पाटील साहेब आले होते, तेव्हा प्रवेश झाला नाही. साहेब आले तेव्हा प्रवेश झाला. माझ्या सारख्या अल्पसंख्यांक माणसाच्या मागे का लागला आहात? 


पवार साहेब माझे दैवत आहे. पवार साहेब माझ्या मागे का लागले हे मला कळत नाही. ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांकांच्या मागे का लागत आहेत? अशी विचारणा हसन मुश्रीफ यांनी केली. मुश्रीफ म्हणाले की, ही निवडणुक नायक विरूद्ध खलनायक अशी आहे, पण तसा उल्लेख केला नाही. जयंत पाटील असे बोलूच शकत नाही, ते असे बोललेले नाहीत. यामागे कोण होते ती माणसे कोण होती ते पहा. जिथे जागा रिक्त आहेत तिकडे जात आहेत. 


हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, मी अनेकदा सांगितले लोकशाहीत एकाद्या वक्तीचे वय 25च्या वर झाले की तो निवडणुक लढू शकतो. आता तर 7 पक्ष झाले आहेत. त्यामुळे उमेदवाराची मांदियाळी झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या