Ambabai Mandir : नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात कन्नड भाषेतील फलक लावल्याने मराठी एकीकरण समितीने आक्षेप घेतला आहे. त्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला निवेदन दिलं आहे. कन्नड भाषेतील फलक काढले नाहीत, तर आम्ही ते फलक काढून टाकू असा इशाराही एकीकरण समितीने दिला आहे.
निवेदनातून सीमाभागात मराठी भाषिकांची गळचेपी होत असताना कोल्हापुरात कन्नड भाषेचे बोर्ड का लावले? असा सवाल करण्यात आला आहे. सीमाभागात मराठी फलक लावू दिले जात नाही, तर मग इथं कन्नड भाषेत बोर्ड का लावले? अशी विचारणा निवेदनातून करण्यात आली आहे. भाविकांना समजण्यासाठी मराठीसोबत इंग्रजीचा वापर करा असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मराठी एकीकरण समितीने अंबाबाई मंदिरातील कन्नड बोर्डना आक्षेप घेतल्यानंतर देवस्थान समितीने एबीपी माझाशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. समितीने याबाबत बोलताना सांगितले की, दक्षिण भारतातील भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाला येतात. त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी हे बोर्ड लावले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले असून याबाबत बैठक लावली जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या