Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज आढावा घेतला. यावेळी केसरकर यांनी बालिंगा पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती दिली. भोगावती नदीत पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने जुन्या असलेल्या बालिंगा पुलावरून प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक बंद केल्यापासून करवीर तालुक्याच्या पश्चिमेसह गगनबावडा तसेच पुढे कोकणात जाणाऱ्या वाहतुकीला प्रचंड फटका बसला आहे. पादचाऱ्यांनाही वाहतूक बंद करण्यात आल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. 


बालिंगा पूल कमकुवत असल्याच्या कारणावरून रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने हाल होत होते. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करावा, यासाठी आंदोलन कण्यात आले होते. यासाठी राज्यमार्ग खात्याला आजपर्यंत (27 जुलै) अल्टिमेट देण्यात आला होता. यानंतर बॅरिकेट काढून रस्ता वाहतुकीस खुला करू, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली होती. 


उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा पूर्ववत सुरू होतील


दरम्यान, दीपक केसरकर आढावा बैठकीत सांगितले की, उद्या (28 जुलै) पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे, पण पंचगंगा नदीची पाणी पातळी एक-एक इंचाने वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून जाऊ नये.  सतर्कता म्हणून आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात. उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा पूर्ववत सुरू होतील. स्थलांतरित झालेल्या नागरिकांना उद्या सकाळपासून घरी जाण्यास सांगितले आहे. मुलांच्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी वेगळी तारीख देण्यात येईल. मुलांच्या परिक्षेवर, अभ्यासावर कोणताही परिणाम होणार नाही. मुंबईत मोठ्या वादळी वाऱ्याची शक्यता आहे, त्यामुळे शाळांना सुट्टी दिली असल्याचे ते म्हणाले. 


कोणती प्रात्यक्षिक झाले असेल तर त्याची माहिती घेतो


दरम्यान, पुण्यात अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक आहेत का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांना विचारण्यात आले असता त्यांनी कोल्हापूरच्या जंगलात जर कोणती प्रात्यक्षिक झाले असेल तर त्याची माहिती घेतो, अशी प्रतिक्रिया दिली. बऱ्याच वेळा ही माहिती सेन्सेटिव्ह असते, त्यामुळे बाहेर येत नाही असे त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या