Gokul Meeting : अभूतपूर्व गोंधळात गोकुळची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हाॅलला सभा पार पडली. या गदारोळामध्येच गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील गोकुळचा एकूण कारभार आणि उलाढालीचा आढावा घेतला. यावेळी महाडिक गटाकडून स्वागत प्रास्ताविक बंद करा, आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या अशा घोषणा देत होते.
त्यानंतर सत्तारूढ संचालक आणि सतेज पाटील तसेच मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना खुन्नस देत जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. या गदारोळात विश्वास पाटील आढावा घेणे सुरुच ठेवले. यावेळी शौमिका महाडिक यांनी आबाजी सभासदांना डोळ्यात पाहून उत्तरे द्या, सभासदांची किती काळ दिशाभूल करणार? असे प्रश्न विचारले.
त्यानंतर गोकुळचे कार्यकारी अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी सभेचे नोटीस वाचन केले. याला हात वर करून मंजुरी देण्यात आली. आयत्या वेळच्या विषयांचे वाचन सुरू झाल्यानंतर आपल्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप करत शौमिका महाडिक यांनी सभात्याग केला. श्री भामटे दूध संस्थेच्या शिवाजी देसाई यांनी दूध वाहतूक निविदा नामंजूर झाल्यानंतर संघाविरुद्ध दावा दाखल झाला होता. या दाव्याचा निकाल संघाच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे श्री व्यंकटेश्वरा यांच्याकडून दाव्याच्या रक्कम वसुलीसाठी व्यंकटेश्वरावर दावा दाखल करण्याचा ठराव केला.
हसूर दूध ससंस्थेचेश्रीपती पाटील यांनी दूध संस्थांची शेअर मर्यादा वाढवू नये अशी मागणी करून दूध दरवाढ केल्याबद्दल संचालक मंडळाच्या अभिनंदन केले.
संचालकांना गाड्या द्या
गोकुळचा कारभार वाढला पाहिजे, दूध संकलन वाढले पाहिजे यासाठी संचालकांना चार चाकी वाहने दिली पाहिजे अशी मागणी पी. डी. धुंदरे यांनी केली.
गोकुळची बचत 10 कोटींवर
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गोकुळची उलाढाल 378 कोटींनी वाढली असून सध्या उलाढाल 2 हजार 929 कोटी रुपये झाली आहे. 59 कोटी भाग भांडवल आहे. टँकर वाहतूक कपात 5 कोटी 8 लाख रुपये, महानंद दूध पॅकिंग बचत 65 लाख, अतिरिक्त रोजनदारी कर्मचारी कपात 1 कोटी 78 लाख, पशुखाद्य वाहतूक भाडे कपात 1 कोटी 75 लाख व अभियांत्रिकी विभागामार्फत विविध प्रकल्पातून झालेली बचत 42 लाख अशी एकूण दहा कोटींची बचत केली जात आहे. पशुखाद्य विक्रीमध्ये 15 टक्के वाढ आहे. त्यामुळे 5 कोटी 76 लाख 47 हजार रुपये अनुदान देऊन दूध उत्पादकांना कमी किमतीत पशुखाद्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.
गोकुळच्या सभेत मंजूर झालेले महत्वाचे ठराव
- बाहेरील राज्यातून जातीवंत म्हैस खरेदी करणाऱ्या उत्पादकांना म्हैसांना व जाफराबादी म्हशीसाठी आता 20 ऐवजी 25 हजार अनुदान मिळणार
- मुरा म्हशीसाठी 25 ऐवजी 30 हजार रुपये अनुदान एक सप्टेंबरपासून देणार
- महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना विस्तारीकरण करणार
- व्यंकटेश्वरा गुडसवर दावा दाखल करणार
- कर्नाटक, गोव्याप्रमाणे दुध उत्पादकाला अनुदान मिळावे
- दूध संस्थांची शेअर मर्यादा वाढवू नये
- दूध दरवाढीबद्दल संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव
इतर महत्वाच्या बातम्या