कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेची (Kolhapur Loksabha) जागा करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांना सोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhavt Thackderay) प्रथमच कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर येत आहेत. उद्या (21 मार्च) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उद्धव ठाकरे राजवाड्यावर जाऊन भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीची राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
उद्धव ठाकरे उद्या शाहू महाराजांची भेट घेणार
कोल्हापूर लोकसभेसाठी महाराजांचे नाव चर्चेत आल्यानंतर महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) तिन्ही पक्षांनी उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, काँग्रेसने (Congress) कोल्हापूर मतदारसंघ (Kollhapul Loksabha) आपल्या पदरात पाडून घेताना शाहू महाराजांना रिंगणात उतरवलं आहे. तेव्हापासून कोल्हापूर लोकसभेची राजकीय गणिते बदलून गेले आहेत. महायुतीमध्ये सुद्धा उमेदवारीवरून खल सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यात महाराजांची भेट घेणार आहेत.
या भेटीबद्दल कमालीची गुप्तता पाळणार पाळण्यात आली असली, तरी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीमुळे उद्धव ठाकरे उद्या महाराजांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट झाले. मिळालेल्या माहितीनुसार उद्या सायंकाळी पाचच्या सुमारास राजवाड्यावर महाराज आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल.या भेटीवेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह शिवसेना उपनेते संजय पवार यांची उपस्थिती असणार आहे. या भेटीमध्ये अर्थातच कोल्हापूर लोकसभेच्या अनुषंगाने तसेच हातकणंगले लोकसभेच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या भेटीनंतर उद्धव ठाकरे सांगलीकडे प्रस्थान करतील. सांगलीमध्ये मिरज या ठिकाणी त्यांची भव्य सभा होणार आहे. त्यामुळे या सभेपूर्वी उद्धव ठाकरे आणि महाराजांची भेट असेल.
कोल्हापूर लोकसभेसाठी संभाजीराजेंकडून भेटीगाठी सुरु
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे यांनी शाहू महाराजांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्याचा दोन दिवसीय दौरा केला. पहिल्या टप्प्यातील या दौऱ्यात तालुक्यातील प्रमुख राजकीय मंडळींच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी अनेक शेतकरी, कामगार बांधव व महिला भगिनींशी देखील संवाद साधला. शाहू छत्रपती महाराजांच्या रूपाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहत असून सर्वसामान्य जनतेच्या भावनेतून महाराजांच्या विजयाची निश्चिती मिळाली, असे प्रतिपादन संभाजीराजे यांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या