कोल्हापूर : महाराष्ट्राची परंपरा शुरा मी वंदितो आणि भाजपची परंपरा चोरा मी वंदिले आरे. कोल्हापूरकर तुम्हाला चालतंय का? कोल्हापुरातील भाजपचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांनी गौप्यस्फोट केला. लोकसभेत आपण मोदींना पाठिंबा देणार म्हणून आपल्यासाठी त्यांनी काम केलं, पण भाजपने विधानसभेत शिवसेनेची ताकद कमी करायला पाहिजे म्हणून शिवसेनेचे उमेदवार पाडले आता लोकसभेला तुम्हाला पाडून तो सूड घ्यायला आलो आहे, मी सोडणार नाही, ज्यांनी माझ्या शिवसैनिकांशी, भगव्याची गद्दारी केली त्यांचा सूड घ्यायला मी कोल्हापूरमध्ये आलो आहे, तुम्हीही घेऊन दाखवा, असे आवाहन शिवसेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात केले. 






शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात गांधी मैदानात शिवशाहू निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना भाजपसह  मोदी शाहांवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, काही प्रश्न विचारतात की शिवसेनेची मत काँग्रेसला ट्रान्सफर होणार का? होणार की नाही? कारण काँग्रेसच्या हातामध्ये मशाल आहे, काँग्रेसच्या हातात मशाल घेऊन चार जूनला आपल्याला विजयाची तुतारी फुंकायची आहे. जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी मी आलो आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार जिथे जिथे असतील, त्यांची निशाणी हात आहे, तुतारी घेतलेला मावळा आहे आणि मशाल आहे याच उमेदवारांना लोकसभेत पाठवा आणि हुकूमशहांचे सरकार गाडून टाका, असे आवाहन त्यांनी केले. 


तुम्हाला राजकारणात मूलं होतं नाहीत त्यात आमचा काय दोष 


ठाकरे म्हणाले की, अटलजी पवार साहेबांचे कौतुक करत होते. गुजरातमध्ये भूकंप आला होता तेव्हा पवार साहेब धावून गेले आणि गुजरातला मदत केली होती. अटलजी पंतप्रधान असताना त्या आपत्ती व्यवस्थापनाचा अध्यक्ष पद पवार साहेबांकडे होते. आणि आता हे जे बोलताहेत यावरून हेच वखवखता आत्मा आहे. कोणी तरी शिवाजी महाराजांशी तुलना केली, अशी तुलना मोदींवरून होऊ शकत नाही. मोदींची तुलना महाराजांसोबत होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या दैवताच्या वाटेला जाऊ नका, नाही तर महाराष्ट्र सहन करणार नाही. जो महाराष्ट्राच्या मुळावरती आलेला आहे त्याचा सुपडासाफ आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला राजकारणामध्ये मुलं होत नाहीत म्हणून आमच्यातले गद्दार चोरून तुम्हाला उभे करावे लागतात, आमची काही पोरं तुम्ही चोरले, कोणी काही गद्दार चोरले. पवार साहेबांचे सुद्धा चोरले. पण महाराष्ट्रातील करोडो लोक सोबत उभे राहिले असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या