Kolhapur Crime : रिमोट सरकवल्याच्या रागातून बायकोला राॅकेल ओतून पेटवून देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सांगवडेवाडीत घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून पतीला काडीपेटी न मिळाल्याने आणि राॅकेलचा वास सहन न झाल्याने पत्नीचा जीव वाचला. पतीने केलेल्या हल्ल्यात पूनम किशोर शिंदे (वय 28) यांचा जीव वाचला असला, तरी किरकोळ जखमी झाल्या आहेत. गोकुळ शिरगाव पोलिसांनी पती किशोर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी हा प्रकार घडला. (Kolhapur Crime)


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 10 वाजता पूनम मुलांसोबत टीव्ही पाहत बसल्या असताना पती किशोरने टीव्हीचा रिमोट मागितला. यावेळी किशोरकडे रिमोट सरकवल्यानंतर दोघांमध्ये जोराचा वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या  किशोरने दरवाजा बंद करून पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत पूनमच्या ओठाला जखम झाली. किशोरने त्यानंतर पूनमच्या अगावर रॉकेल ओतून काडेपेटी शोधण्याचा प्रयत्न करू लागला, पण काडेपेटी सापडली नाही. तसेच रॉकेलचाही वास सहन न झाल्याने त्याने दरवाजा उघडला. याचवेळी पूनमने घरातून बाहेर धावल्याने केवळ दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला. या घटनेनंतर पत्नी पूनमने गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


Kolhapur Crime : तरुणीचा विनयभंग करणाऱ्या कारचालकाला बेड्या


दरम्यान, कोल्हापुरातून (Kolhapur Crime) पुण्याला जाणाऱ्या तरुणीचा खासगी कंपनीच्या कार चालकाने निनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार उघडकीस आला. तरुणीने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित कारचालकाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कार भाड्याने घेऊन पुण्याला जाताना कारचालकाने तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. तरुणीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवले. याबाबत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा (juna rajwada police station) पोलिसांनी कार चालक रोहित राजेंद्र कार्वेकर (वय 28, रा. दानोळी ता. शिरोळ जि. कोल्हापूर) याला सोमवारी पोलिसांनी अटक केली. 


कोल्हापुरातील तरुणी कामानिमित्त कार भाड्याने घेऊन बाहेरगावी जात असते. पीडित तरुणीने नेहमीप्रमाणे गुरुवारी खासगी कंपनीची कार भाड्याने घेऊन पुण्याला जाताना कारचाल कर्वेकरने तिच्याशी गैरवर्तन केले. संबंधित तरुणीने  कोल्हापुरात (Kolhapur Crime) परतल्यानंतर संबंधित कंपनीकडे तक्रार दाखल केली.  या तक्रारीनंतर कंपनीच्या मालकाने कारचालकाला कामावरून कमी केले होते. त्यामुळे याचाच राग मनात धरून त्याने पीडित तरुणीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवले. त्यामुळे पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेत संबंधित कारचालकालविरोधात गुन्हा दाखल केला. 


इतर महत्वाच्या बातम्या