MVA on Chandkrant Patil : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रासिटीचा (atrocity agianst chandrakant patil) गुन्हा दाखल करा, अशी मागणी कोल्हापुरात महाविकास आघाडीने केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन दिले. निवदेनात म्हटले आहे की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याने जातीय तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून याला चंद्रकांत पाटील जबाबदार आहेत. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करणे, राष्ट्रपुरुषांचा अवमान करणे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
'शाईफेकीचा दुर्दैवी प्रकार घडायला नको होता, पण दादांची ही सातवी ते आठवी माफी असेल'
दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif on Chandrakant Patil) यांनी शाईफेकीचा दुर्दैवी प्रकार घडायला नको होतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, दादांची ही सातवी ते आठवी माफी असेल, असा खोचक टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. हसन मुश्रीफ आज कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, शाईफेकीसारखा दुर्दैवी प्रकार घडायला नको होता, पण दादा सातत्याने अशी वक्तव्य करतात. यावेळी त्यांनी अनिल देशमुखांना मिळालेल्या जामीनावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, जामीनाची बातमी ऐकून आम्ही आनंदीत झालो होतो, पण पुन्हा दहा दिवसाची स्थगिती दिली असेल, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. ईडीने जामीन दिला, पण सीबीआयने विरोध केला. त्यांचं वय 75 आहे. त्यांना दवाखान्यात दाखल करावं लागत आहे. न्यायालय याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल.
तर ठाकरे गटाचे खासदार निधी देतील
मुश्रीफ यांनी भाजप आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या धमकीचाही समाचार घेतला. अशा प्रकारचे वक्तव्य कधी केली जात नाहीत. ते मदत करणार नसतील तर ठाकरे गटाचे खासदार निधी देतील. अशा वक्तव्याने जनता चिडून उठेल आणि त्यांच्या उमेदवारांचा पराभवच करेल असे ते म्हणाले. राणे यांनी आपल्या विचाराचा उमेदवार निवडून न दिल्यास निधी न देण्याची धमकी प्रचार करताना दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या