कोल्हापूर : विशाळगड परिसरामध्ये यासीन भटकळ राहिल्याचे चर्चा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भटकळ कधी कोणाकडे राहिला होता याची चौकशी करणार असल्याचे मोठं विधान कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. पोलिसांनी त्या संदर्भात काय भूमिका घेतली याबाबतही चौकशी करणार असल्याचे म्हटलं आहे. 


कोल्हापूरमध्ये वारंवार घडणाऱ्या दंगलीबाबत सर्वाच्या चौकशीची गरज


विशाळगडवर झालेल्या हिंसचारानंतर शाहू महाराज यांनी मंगळवारी पाहणी केली. कोल्हापूरमध्ये वारंवार घडणाऱ्या दंगलीबाबत सर्वांची चौकशी करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर अशांत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीप यांनी वक्तव्य केले. पोलीस याबाबत गाफील राहिले का याची देखील चौकशी करू, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आपल्याकडे जी माहिती होती ती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती आणि माध्यमांना सुद्धा सांगितल्याचे मुश्रीफ म्हणाले. 


शांतेतेने आंदोलन करण्याचा शब्द दिला होता 


दरम्यान, मुश्रीफ म्हणाले की, विशाळगडावरील आंदोलन शांततेत करण्याचा शब्द देण्यात आला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलीस गाफिल राहिले आहेत का? नेमकं काय झालं याची चौकशी होईल असं त्यांनी सांगितले.


संभाजीराजेंच्या टीकेवर काय म्हणाले? 


शाहू महाराज हिंसाचारग्रस्त गजापूर भागाचा आढावा घेतल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया दिली होती. या संदर्भाने विचारण्यात आले असता ते म्हणाले की अशा घटना घडू नये अशा घटना घडू नयेत याची आता खबरदारी घेऊ. यामध्ये कोणाची चूक झाली याचा तपास होईल. वातावरण पूर्व पदावर यासाठी सलोखा राखण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. संभाजीराजेंनी माझ्यावर केलेल्या टिकेला शाहू महाराजांनी उत्तर दिलं असल्याचे म्हणाले. दरम्यान, एमआयएमच्या मोर्चाला परवानगी दिली जाऊ नये, याबाबत मी पोलिसांशी बोलणार असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. 


शाहू महाराजांसमोर महिलांचा आक्रोश 


दरम्यान, हिंसाचारग्रस्त गजापुराला मंगळवारी शाहू महाराज यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी अनेक महिलांना शाहू महाराजांना पाहताच अश्रु अनावर झाले. यावेळी हिंसाचारग्रस्त परिसर पाहून शाहू महाराज यांना गलबलून आले. यावेळी पावसात भिजत असलेल्या चिमुकलीला स्वत:च्या अंगावरील जॅकेट देत त्यांनी आपल्या संवेदनशीलतेचे दर्शन दिले.


इतर महत्वाच्या बातम्या