Kolhapur Crime : कोल्हापूर शहरात तीन अट्टल गुन्हेगारांवर वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी हद्दपारीची कारवाई झाल्यानंतर (Kolhapur Crime) इचलकरंजीमधील रेकॉर्डवरील दोघांना एक वर्ष तर एकास 6 महिने कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. नागेश ऊर्फ नांग्या ऊर्फ नागराज शिवाप्पा हिरेकुरबुर ऊर्फ पुजारी (रा. पाटील मळा), अश्पाक ऊर्फ आसिफ अल्लाउद्दीन राजनन्नावर (रा. आसरानगर), तोहीद अर्षद सावनूरकर (रा. विक्रमनगर) अशी त्यांचे नावे आहेत. या कारवाईचे आदेश प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिले. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (Kolhapur Crime) तोहीदच्या विरोधात दंगा, दरोडा, फसवणूक, खंडणीचा, आसिफवर खुनाचा प्रयत्न, मारामारीचा गुन्हा दाखल आहे. नागेशवर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, जबरी चोरी, मारामारीचा गुन्हा दाखल आहे. या तिघांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी वरिष्ठांकडे पाठवला होता. त्यांनी मंजुरीसाठी हा प्रस्ताव प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्याकडे पाठवला होता. डॉ. खरात यांनी याला मंजुरी दिली. आसिफ राजन्नवार आणि नागेश हिरेकुरबुर या दोघांना एक वर्ष तर तोहीद सावनूरकर याला 6 महिने कोल्हापूर जिल्ह्यतून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यातून तिघे वर्षासाठी हद्दपार 


दरम्यान, कोल्हापूर शहरातील (Kolhapur Crime) तीन अट्टल गुन्हेगारांना पहिल्याच दिवशी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे. यादवनगरातील तीन गुन्हेगारांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे. अश्विन अनिल शेळके (गणेश मंदिराजवळ, यादव नगर) गौरव अनिल जानकर (यादव नगर) आणि परेश अनिल कस्तुरे (गणेश मंदिराजवळ, यादवनगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती राजाराम पोलिसांनी दिली आहे. 


या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे आणि गुन्हे शोध पथकाचे प्रमुख भगवान शिंदे यांनी करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. यावर  झालेल्या सुनावणीनंतर तिघांना एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या आदेशानुसार हा प्रस्ताव शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात आला होता. (Kolhapur Crime)


इतर महत्वाच्या बातम्या