Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यासाठी 31 डिसेंबरचा शनिवार ठरला घातवार ठरला. वेगवेगळ्या चार अपघातांनी कोल्हापूर जिल्हा (kolhapur Crime) हादरून गेला. शनिवारी कोल्हापूर शहरात दोन अपघात झाले, तर पहाटेच्या सुमारास सहलीसाठी गेलेल्या इचलकरंजीमधील शाळकरी मुली सहलीवरून परत येत असताना त्यांच्या बसचा बारामतीजवळ पाहुणेवाडीनजीक अपघात झाला. कोल्हापूर शहरात रंकाळा टाॅवरजवळ झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास फुलेवाडी-रिंगरोडवर दुचाकी अपघात होऊन शाळकरी मुलाचा अपघात झाला. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावरील केर्लीजवळ मोटार आणि दुचाकीचा अपघात झाला.  


इचलकरंजीच्या शाळकरी मुलींच्या सहलीच्या बसला अपघात 


इचलकरंजीमधील सागर क्लासेस 8 वी ते 10 वीच्या क्लासमधील मुलींची औरंगाबाद,दौलताबाद,वेऊळ,शिर्डी,शनी शिंगणापूर या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीवरून परत येत असतानाच (Ichalkaranji Girls picnic bus accident in Baramati) अरुंद रस्त्यावर ड्रायव्हरला समोरून अंदाज न आल्याने बस पुलावरून खाली कोसळली. या अपघातामध्ये 24 मुली जखमी झाल्या. दरम्यान, यामधील एका मुलीला उपचारासाठी पुण्यामध्ये हलविण्यात आले असून एका मुलीला उपचारासाठी इचलकरंजीला रवाना करण्यात आले. बसमध्ये एकूण 48 मुली व 5 स्टाफ मेंबर यांचा समावेश होता. उर्वरित मुलींना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले.  


रंकाळा टाॅवरजवळ महिला ठार


इचलकरंजीमधील अपघाताची घटना ताजी असताना सकाळी दहाच्या सुमारास कोल्हापूर (Kolhapur Crime) शहरातील रंकाळ्याजवळ अन्य एक अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू जेसीबीच्या बकेटचा धक्का लागल्याने दुचाकीवरून तोल गेल्यानंतर सरळ चाकाखाली आल्याने मृत्यू झाला. अनुराधा मिलिंद पोतदार (वय 46 रा. फुलेवाडी, कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.


अनुराधा यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. अनुराधा सूर्या हॉस्पिटलमध्ये रिसेप्सनिस्ट म्हणून नोकरीस होत्या. या अपघातामध्ये त्यांचे पती मिलिंद पोतदार हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सूर्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. अनुराधा यांचे पती मिलिंद हे उद्यमनगरमधील एका खासगी कंपनीत काम करतात. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. 


फुलेवाडी रिंगरोडला शाळकरी मुलाचा अपघात 


या दोन घटना ताज्या असताना दुपारच्या सुमारास आणखी एक अपघात (Kolhapur Crime) झाला. फुलेवाडी रिंगरोडला शाळकरी मुलगा दुचाकी चालवत असताना गंभीर अपघात झाला. गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावरही एक अपघात झाला. केर्लीजवळ मोटार आणि दुचाकीचा अपघात झाला. 


इतर महत्वाच्या बातम्या